भोकर शिवारात दररोज बिबट्याचे दर्शन; शेतकर्‍यांत भितीचे वातावरण

तातडीने पिंजरा लावणार-प्रतिभा पाटील
भोकर शिवारात दररोज बिबट्याचे दर्शन; शेतकर्‍यांत भितीचे वातावरण

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील वडजाई परीसरातील खोकर - टाकळीभान रोडलगत असलेल्या बेरड यांचे उसाच्या शेतात गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याची मादी व तीन बछड्यांचे दर्शन होत असल्याने परिसरातील शेतकर्‍यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीसरात वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याच्या मादी व बछड्याना जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

भोकर शिवारातील खोकर - टाकळीभान रोडलगत सोपान रायभान बेरड व एकनाथ रायभान बेरड यांच्या गट नं. 155 यांचे शेतातील रस्त्याच्या लगत असलेल्या ओंकारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस सायंकाळी गेल्या चार दिवसांपासून या बिबट्याच्या मादीचे व तीन बछड्याचे दर्शन होत आहे. याठिकाणी बिबट्याच्या मादीचे दर्शन होत असताना ही मादी मुक्तपणे रोडच्या कडेला येवून बसत आहे. त्यामुळे परीसरातील शेतकर्‍यांत मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. यावेळी अनेक उत्साही युवकांनी या बिबट्याच्या मादीचे चार चाकीतून जाऊन फोटो शुटींग बरोबरच व्हिडीओ काढण्याचा आनंद घेतला.

ओंकारेश्वर महादेव मंदिरात असलेल्या सार्वजनिक शिवलीलामृत सोहळ्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळीमुळे भीती तयार झाली आहे. त्याचबरोबर या बिबट्यांची व मादीची मोठ्या प्रमाणात चर्चा व भीती निर्माण होत आहे. याबाबतची माहिती वनसरंक्षक प्रतिभा पाटील यांचेपर्यंत पोहचताच त्यांनी लागलीच सूर्यकांत लांडे यांना घटनास्थळी पाठवित नागरिकांना धिर देण्याचा प्रयत्न करत याठिकाणी तातडीने पिंजरा लावून बंदोबस्त करणार असल्याचे आश्वासन दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com