भोकर, खोकर शिवारात वादळ व पावसाचा तडाखा

घरावर व रस्त्यावर विजेचे पोल पडले, उस मका भुई सपाट
भोकर, खोकर शिवारात वादळ व पावसाचा तडाखा

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर व खोकर परीसरात काल रात्री ढगांच्या गडगडाट, विजेच्या कडकडाटास मुसळधार पाऊस झाला. विज पुरवठा खंडीत झाला.या पावसाने खोकर शिवारात उभे ऊस भुईसपाट झाले तर अनेक ठिकाणी विजवाहक तारांसह विजेचे पोल पडले, अनेक झाडे उन्मळून पडले. सुदैवाने अनर्थ टळला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

खोकर शिवारात काल शनिवार दि.10 सप्टेबरच्या रात्री 9 वाजेच्या दरम्यान अचानक विजेच्या कडकडाटासह, वादळी वारे व मुसळधार पावसाचा तडाखा बसला. या वादळामुळे खोकर - कारेगाव रोडलगत वस्ती असलेले अशोक बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब काळे यांचे राहते घरावर विज वाहक तारा पडल्या, सुदैवाने विज पुरवठा खंडित असल्याने मोठा अनर्थ टळला.

येथून काही अंतरावर असलेल्या रमेश पवार यांचे वस्तीजवळ खोकर-कारेगाव रोडवर विजवाहक तारा व पोल पडल्याने वाहतुक विस्कळीत झाली. त्याच बरोबर मुसळधार पाऊस व वादळी वार्‍यामुळे परिसरात अनेक शेतकर्‍यांचे उभे असलेले ऊस व मका पडल्याने या शेतकर्‍या चे मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी खोकर व कारेगाव शिवाराला विज पुरवठा करणार्‍या विज वाहक तारा व पोल पडल्याने परीसरातील विज पुरवठा खंडीत झाला असला तरी भोकर सबस्टेशन मधुन विजपुरवठा होणारी 12 गांवाचा विज पुरवठा खंडित झाल्याचे वृत्त असुन या परिसरात झालेल्या नुकसानीचे आज चित्र स्पष्ट होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com