भोकर येथे दोघांना लोखंडी गजाने मारहाण; 9 जणांविरुध्द गुन्हा

भोकर येथे दोघांना लोखंडी गजाने मारहाण; 9 जणांविरुध्द गुन्हा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे महिला सौ. छाया दिलीप कणगरे, वय 45 रा. खोकर, इंदिरानगर या व दिगंबर रोहिदास भोंडगे हे भोकर येथे घरामागे असलेल्या

चर्चच्या ओट्याचे बांधकाम करत असताना तेथे 9 जणांनी एकत्र येऊन लोखंडी गज डोक्यात मारून डोके फोडले व धमकी दिली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोकर येथे महिला सौ. छाया दिलीप कणगरे, खोकर, इंदिरानगर या व दिगंबर रोहिदास भोंडगे हे भोकर येथे घरामागे असलेल्या चर्चच्या ओट्याचे बांधकाम करत असताना सुनील विश्वनाथ भोंडगे, अनिल विश्वनाथ भोंडगे, बाळासाहेब विश्वनाथ भोंडगे, विश्वनाथ सुखदेव भोंडगे, सविता अनिल भोंडगे, अनिता सुनील भोंडगे, रंभा बाळासाहेब भोंडगे, सिंधू विश्वनाथ भोंडगे, कोमल बाळासाहेब भोंडगे, यांनी एकत्र येऊन लाथाबुक्क्याने मारहाण केली. सौ. छाया कणगर या समजावून सांगत असताना त्याचा राग आल्याने आरोपींनी लोखंडी गज डोक्यात मारून डोके फोडले व धमकी दिली.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात छाया दिलीप कणगरे यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणारे आरोपी सुनील विश्वनाथ भोंडगे, अनिल विश्वनाथ भोंडगे, बाळासाहेब विश्वनाथ भोंडगे, विश्वनाथ सुखदेव भोंडगे, सविता अनिल भोंडगे, अनिता सुनील भोंडगे, रंभा बाळासाहेब भोंडगे, सिंधु विश्वनाथ भोंडगे, कोमल बाळासाहेब भोंडगे, सर्व रा. भोकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक खळेकर पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com