भोजापूर धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने तळेगाव भागातील बंधारे भरा

जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सांगळे यांची मागणी
भोजापूर धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने तळेगाव भागातील बंधारे भरा

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

सिन्नर तालुक्याचा काही भाग व संगमनेर तालुक्याच्या निमोण भागाला वरदान ठरणारे भोजापूर धरण यावेळी लवकर ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे भोजापूर धरणाच्या पाण्याने निमोण - तळेगाव भागातील बंधारे, पाझर तलाव भरून द्यावेत, अशी मागणी उत्तर नगर जिल्हा युवा काँग्रेसचे कार्याध्यक्ष इंजि. सुभाषराव सांगळे केली आहे.

उत्तर नगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष इंजि. सुभाषराव सांगळे सहित पदाधिकार्‍यांनी धरणावर जावून भोजापूर धरणाच्या ओव्हर फ्लोच्या पाण्याची पाहणी केली. प्रसंगी जगदंबा दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन राजेंद्र मुंगसे, संचालक अनिल गाजरे, रामनाथ शेवकर, तुकाराम कहांडळ, सुभाष मुंगसे हे उपस्थित होते. यावेळी मागणी करताना इंजि. सांगळे म्हणाले, दोन वर्षांपूर्वी भोजापूर धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर माजी महसूलमंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भोजापूर धरणाचे ओव्हर फ्लोचे पाणी टेलच्या देवकौठे गावापर्यंत नेले होते.

यावेळी भोजापूर धरण वेळेवर ओव्हर फ्लो झाले आहे. साहजिकच परिसरात आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे यावेळी देखील भोजापूर धरणाच्या ओव्हर फ्लोच्या पाण्याने तळेगाव भागातील बंधारे, पाझर तलाव भरण्यात यावेत, अशी मागणी उत्तर नगर जिल्हा युवा काँग्रेसचे कार्याध्यक्ष इंजि. सुभाषराव सांगळे केली आहे. भोजापूर धरणाचे ओव्हर फ्लोचे पाणी टेलच्या देवकौठे गावापर्यंत नेण्यासाठी माजी महसूलमंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केला जाणार असल्याचे इंजि. सुभाषराव सांगळे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com