भिंगारची कर्डिले टोळी 15 महिन्यांसाठी हद्दपार

भिंगारची कर्डिले टोळी 15 महिन्यांसाठी हद्दपार

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील तीन जणांच्या सराईत गुन्हेगारी टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी 15 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. टोळीप्रमुख सागर विठोबा कर्डिले (वय 34), सचिन ऊर्फ लखन मंजाबापु वारूळे (वय 28), गणेश गोरख साठे (वय 29 सर्व रा. वारूळवाडी ता. नगर) अशी हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. अधीक्षक पाटील यांनी याबाबत आदेश पारीत केला आहे.

भिंगार पोलीस ठाणे हद्दीसह नगर शहरात संघटीपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्‍या कर्डिले टोळीतील चार जणांविरोधात दोन वर्षांकरीता हद्दपारीची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव भिंगार कॅम्प पोलिसांनी नोव्हेंबर 2020 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठविला होता.

या टोळीविरोधात गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, रस्तालुट आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने या टोळीची दहशत कमी करण्यासाठी टोळी प्रमुख कर्डिले व त्याच्या दोन साथीदारांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार कारवाई करून 15 महिन्याकरीता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. सदर हद्दपार इसमांविरूद्ध यापूर्वी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती. संघटीतपणे गुन्हे करणार्‍या टोळीविरोधात माहिती संकलीत करून हद्दपार सारखी प्रतिबंधक कारवाई करणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com