भिंगारमध्ये युवकावर हल्ला

तिघांविरूद्ध भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा
भिंगारमध्ये युवकावर हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

युवकाला लोखंडी पाईपने मारहाण करत त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अभिषेक मच्छिंद्र बनसोडे (वय 23 रा. गोटी चौक, नागरदेवळे) असे जखमी युवकाचे नाव आहे. भिंगारमधील नागरदेवळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध खूनाचा प्रयत्न, आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

महेश गौतम पाखरे, अतुल गौतम पाखरे, स्वप्नील ऊर्फ सोप्या पाखरे (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. नागरदेवळे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. रात्री 11 वाजेच्या सुमारास अभिषेक बनसोडे नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या समोरील आरोग्य केंद्राच्या पाठीमागे लघुशंककेसाठी जात असताना आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी ग्रामपंचयात समोर अभिषेकला गाठून लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण केली.

स्वप्नील पाखरे याने त्याच्याकडील चाकूने अभिषेकवर हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. काही एक कारण नसताना आरोपींनी मारहाण केल्याचे अभिषेकने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी शहर उपअधीक्षक विशाल ढुमे, सहायक निरीक्षक देशमुख यांनी भेट दिली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com