भिंगारमधील अतिक्रमणावर कारवाई

वाहतुकीस अडथळा ठरणारी दुकाने हटविली
भिंगारमधील अतिक्रमणावर कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगार शहरात (Bhingar City) वाहतुकीस अडथळा (Obstruction of Traffic) ठरणार्‍या पथविक्रेत्यांवर कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून कारवाई (Action taken by Cantonment Board Against Street Vendors) करण्यात आली. चांदणी चौक (Chandani Chowk) ते मोती चौक (Moti Chowk) दरम्यान रस्त्याच्या कडेला अतिक्रमणात (Encroachment) असलेल्या सुमारे 25 पथविक्रेत्यांची दुकाने गुरूवारी सकाळी काढण्यात आली. कॅन्टोन्मेंट बोर्ड, आर्मी व भिंगार कॅम्प पोलिसांनी (Cantonment Board, Army and Bhingar Camp Police) ही कारवाई केली.

भिंगार शहरात (Bhingar City) नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. रस्त्याच्या कडेला असलेली पथविक्रेत्यांची दुकाने वाहतुकीला अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे आल्या होत्या. आर्मीचे वाहने जाण्या-येण्यासही ही दुकाने अडथळा ठरत होती. यासंदर्भात आर्मीने वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. गुरूवारी सकाळी कॅन्टोन्मेंट बोर्ड, आर्मी व भिंगार पोलिसांनी (Cantonment Board, Army and Bhingar Camp Police) संयुक्त कारवाई करत चांदणी चौक ते मोती चौक दरम्यान रस्तेच्या कडेला असलेल्या पथविक्रेत्यांच्या दुकानावर कारवाई करून ती हटविली. यामुळे वाहतुक मार्ग मोकळा झाला असून वाहतुक कोंडाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com