नगर : भिंगार 21 पर्यंत लॉक

नगर : भिंगार 21 पर्यंत लॉक

गवळीवाडा नव्याने कंटेनमेंट । कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आदेश

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

भिंगार शहरातही कोरोना पॉझिटिव्ह पेशंटचा सिलसीला सुरूच आहे. काल रात्री गवळीवाड्यात कोरोना बाधित सापडल्याने हा भाग कॅन्टोमेंट बोर्डाने कंटेनमेंट घोषित केला आहे. त्यामुळे भिंगार आता 21 जुलैपर्यंत लॉक असणार आहे.

भिंगार शहरातील गवळीवाडा भागात आजपर्यंत सर्वाधिक पेशंट सापडले. 30 जुन रोजी कॅन्टोमेंट बोर्डाने लोहार गल्ली, मुळे गल्ली व गवळीवाडा 14 जुलैपर्यंत कंटेनमेंट घोषित केला होता. त्या बाजुचा सदर बाजार व उर्वरित भिंगार हे बफर झोन असल्याने तेथेही लॉक करण्यात आले.

आज पुन्हा गवळीवाडा नव्याने कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. जुनी महाराष्ट्र बँक ते घर नंबर 390 पर्यंतचा परिसर हा कंटेनमेंट असणार आहे. त्याबाजुचा सदर बाजार व उर्वरित भिंगार हे बफर झोन करण्यात आले आहे. 21 तारखेपर्यंत हा कंटेनमेंट लागू असेल असे आदेश कॅन्टोमेंट बोर्डाचे सीईओ विद्याधर पवार यांनी काढले आहेत.

भिंगार हे छोटे उपनगरा असून गल्लीबोळात विस्तारले आहे. त्यामुळे एक भाग कंटेनमेंट केला तर उर्वरित भिंगार बफर झोन करताना अख्खे भिंगारच त्यात येते. आज पुन्हा नव्याने कंटेमेंट झोन झाल्यामुळे 14 तारखेची ऑर्डर अपसूकच 21 तारखेपर्यंत लांबली आहे. पाथर्डी-नगर हायवे मात्र त्यातून वगळण्यात आला आहे. कंटेनमेंटमधील किराणा दुकान, दूध, भाजीपाला विक्री, मेडिकलही बंद असणार आहेत. बफर झोनमध्ये काहीशी सवलत मिळणार आहे. कंटेनमेंटमधील लोकांना बाहेर ये-जा करण्यावरही प्रतिबंध करण्यात आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com