भिंगारमध्ये दरोडेखोरांची टोळी जेरबंद

भिंगार पोलिसांची कामगिरी
भिंगारमध्ये दरोडेखोरांची टोळी जेरबंद

अहमदनगर|Ahmedagar

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील (Gang Preparing to commit a Robbery) तिघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी (Bhingar Camp Police) शुक्रवारी रात्री सारसनगर (Sarasnagar) परिसरातील कानडे मळा येथे अटक (Arrested) केली. केशव ऊर्फ काज्या ताज्या भोसले (वय 30), मयुर ऊर्फ हरीष युवराज काळे (वय 25), वैभव नखर्‍या चव्हाण (वय 25, तिघे रा. भिंगार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीतील ताज्या पाच्या भोसले व रूपेश ताज्या भोसले (दोघे रा. भिंगार) हे पसार झाले आहेत. पोलीस नाईक राहुल द्वारके यांच्या फिर्यादीवरून पाच जणांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिंगार परिसरात (Bhingar) दुचाकीवरून काही दरोडेखोर कुठेतरी दरोडा टाकण्यासाठी जात असल्याची गुप्त माहिती भिंगार पोलीस ठाण्याचे (Bhingar Police Station) सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख (Assistant Inspector of Police Shishirkumar Deshmukh) यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना सोबत घेत सारसनगर परिसरातील कानडे मळा येथे सापळा लावला. दोन दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी घेराव घातला. यावेळी दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले तर तिघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

पोलिसांंनी त्या तिघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे लोखंडी कोयता, दोन लाकडी दांडके, मिरची पावडर, दोरी मिळून आली. पोलिसांनी त्यांच्याकडील सर्व साहित्य व दोन दुचाकीं असा 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणशेवरे करीत आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक देशमुख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com