भिंगार छावणी मंडळाची निवडणूक सहा महिने लांबणीवर

भिंगार  छावणी मंडळाची निवडणूक सहा महिने लांबणीवर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगार येथील छावणी मंडळाची निवडणूक पुन्हा सहा महिने पुढे ढकलण्यायत आली आहे. तसेच, विद्यामान सदस्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या सदस्यांना एकुण 13 महिने मुदतवाढ मिळाली आहे. याबाबतचा आदेश केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या उपसंचालक शालिनी पांडेय यांनी बुधवारी मंडळाच्या कार्यालयाला पाठविला आहे. नगरमधील भिंगारसह देशातील 56 बोर्डाच्या सदस्यांना ही संधी मिळाली आहे.

नगर शहराजवळील भिंगार येथे छावणी मंडळ असून त्यामार्फत भिंगारचा कारभार चालतो. सात वार्डातून सात सदस्य निवडले जातात. त्यातून उपाध्यक्ष निवडला जातो. राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रत्येकी तीन तर भाजपचा एक सदस्य असलेल्या भिंगार छावणी मंडळाची मुदत 10 फेबु्रवारी 2020 मध्ये संपली.

त्यापूर्वीच निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली. वार्डनिहाय मतदार यादी फायनल करत आरक्षणाची प्रोसेसही पूर्ण करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या. नंतर या निवडणुका होतील असे चिन्ह असतानाच करोनाचे संकट आले.

या काळात निवडणूक होणार काही याची उत्सुकता असतानाच संरक्षण मंत्रालयाने काल बुधवारीच आदेश काढत विद्यमान सदस्यांना पुन्हा दुसर्‍यांदा सहा महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता किमान सहा महिने तरी मंडळाच्या निवडणुका होणार नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे.

सदस्यांना आता तिसर्‍यांदा मुदतवाढ मिळणार नाही. निवडणुका झाल्या तर ठिक अन्यथा नागरिकांमधून छावणी मंडळ अर्ज मागविते. प्राप्त अर्जातून एका सदस्यांची निवड केली जाते. ही निवड करण्याचे सर्वाधिकार हे पुणे येथील ऑफिसला आहेत. त्यामुळे सहा महिन्यात निवडणूक न झाल्यास एक सदस्यीय बोर्ड येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com