भेर्डापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

भेर्डापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात  काँग्रेसचे आंदोलन

श्रीरामपूर (प्रतिनिधी) / Shrirampur - पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात अहमदनगर जिल्हा व अहमदनगर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने भेर्डापूर येथील बाबा पेट्रोल पंपावर निषेध आंदोलन करून स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

आ. लहु कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्‍वर (माऊली) मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली व विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश क्षीरसागर, प्रदेश सचिव अक्षय नाईक यांच्या उपस्थितीत एन. एस. यू. आय. सर्वच फ्रंटल च्या वतीने इंधन दरवाढ, खाद्यतेल दरवाढ व गॅसच्या वाढलेल्या दराच्या विरोधात सह्यांची मोहीम भेर्डापूर (ता. श्रीरामपूर) येथे आंदोलनाचे आयोजन केले होते.

यावेळी मुरकुटे, नाईक, क्षीरसागर, प्रा. पवार यांनी निषेधपर मनोगते व्यक्त केली यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत इंधन दरवाढी विरोधात निषेध व्यक्त केला.

याप्रसंगी सरपंच अनिता कांदळकर उपसरपंच प्रताप कवडे, प्रा. डॉ. बाबासाहेब पवार, अप्पासाहेब कवडे, रोहित कवडे, चंद्रकांत कांदळकर, गणपत राऊत, राहुल बनकर, अनिल दांगट, करीम फकीर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com