भेंड्यातील दोन घरांवर वीज कोसळली

भेंड्यातील दोन घरांवर वीज कोसळली

भेंडा |वार्ताहर|Bhenda

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) भेंडा बुद्रुक (Bhenda Budruk) येथील आबासाहेब तुपे व भेंडा खुर्द येथील इंजिनिअर दीपक नवले या दोघांचे घरावर वीज पडल्याची (house was struck by lightning) घटना दि.5 ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या घटनेत सुदैवाने कुठली ही जिवीत नाही झालेली नाही.

भेंडा (Bhenda) परिसरात दि.5 रोजी सायंकाळी वारा-ढगांच्या कडकडाटासह पर्जन्यवृष्टी झाली.अवघ्या तासाभरात 70 मिमी पावसाची नोंद झाली. भेंडा (Bhenda) येथे आज पर्यंत 680 मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

भेंडा बुद्रुक (Bhenda Budruk) येथील फिटर आबासाहेब तुपे यांच्या घराचे जिन्यासाठी छतावर बांधलेल्या टॉवरवर वीज पडून (Struck by lightning) भिंती फोडून वीज आरपार झाली. यात भिंतीला भगदाड पडण्या व्यतिरिक्त कोणते ही नुकसान (Loss) झाले नाही.

तर भेंडा खुर्द येथे इंजिनिअर दीपक नवले यांचे घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीसाठी लावलेल्या लोखंडी स्टँडला विज येऊन आदळली. त्यामुळे स्टॅण्ड खालील फरशी व स्लॅबचा थोडा भाग फुटला आहे. दोन्ही ठिकाणी कोणत्याही प्रकारची जिवित हानी झालेली नाही. मात्र विजेची वायरिंग जळून घरातील विजेवर चालणारी सर्व उपकरणे खराब झाली आहेत. विज आदळल्याने झालेला प्रंचड आवाज व उजेड यामुळे तुपे व नवले कुटुंबातील सर्व सदस्य बराच वेळ घाबरलेल्या अवस्थेत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com