भेंड्यात हॉटेल व्यवसायाच्या आडून बेकायदा दारुविक्री

पोलिसांची कारवाई
भेंड्यात हॉटेल व्यवसायाच्या आडून बेकायदा दारुविक्री

भेंडा |वार्ताहर| Bhenda

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे करोना लॉकडाऊन व संचारबंदी असतानासुद्धा सर्व

नियमांचे उल्लंघन करून हॉटेल व्यवसायाचे आडून बेकायदा देशी-विदेशी दारू विक्री करणार्‍या दारू विक्रेत्यांवर नेवासा पोलिसांनी छापा टाकून हजारो रुपयांची दारू जप्त केल्याची घटना सोमवार दि. 19 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, भेंडा बुद्रुक बस स्टॅण्ड ते गाडी गटयार्ड दरम्यान रस्त्याच्याकडेला असलेल्या हॉटेलमधून बेकायदा दारू विक्री होत असल्याची माहिती नेवासा पोलिसांना मिळाली. त्यावर पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांचे पथकाने भेंडा येथील रस्त्याच्या कडेला राहत असलेल्या एका महिलेच्या घरी झडती घेतली असता तिथे देशी व गावठी दारू मिळून आली.

तसेच जुना भेंडा गट ऑफिस समोरील तीन हॉटेलची झडती घेतली असता त्या तीनही ठिकाणी बेकायदा दारू साठा आढळून आला. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय करे हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले. या छाप्यात हजारो रुपयांची बेकायदा दारू पकडण्यात आली. काही गाव पुढार्‍यांनी कारवाई करू नये यासाठी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस निरीक्षक विजय करे यांनी हा दबाव झुगारून लावल्याची चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com