भेंड्यात होणार शासन हमीभाव तुर खरेदी

नाव नोंदणी करण्याचे शेतकर्‍यांना आवाहन
भेंड्यात होणार शासन हमीभाव तुर खरेदी

भेंडा |वार्ताहर| Bhenda

हमीभाव तुर खरेदी साठी नाफेडने आदेश दिले आहेत. शासनाने यावर्षी तुर पिकास 6 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव देण्याचे जाहीर केले असून त्यासाठी नाव नोंदणीस प्रारंभ झाला आहे .

नेवासा तालुक्यातील ज्यांच्याकडे तुरीचे पीक आहे त्यांनी आपली ऑनलाइन नाव नोंदणी करण्याचे आवाहन किसान समृद्धी शेतकरी कंपनीचे व्यवस्थापक स्वराज भगवान गरड यांनी केले आहे.

भेंड्यात होणार शासन हमीभाव तुर खरेदी
पेरूची फोड झाली गोड

नाफेड व महा एफपीसी यांच्या माध्यमातून ही हमीभाव खरेदी प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, सातबारा उतार्‍यावर तूर पिकाची नोंद व तलाठ्याची सही, आधार कार्ड, बँक खात्यास जोडलेला मोबाईल नबर, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक घेऊन शेतकरी कंपनीच्या भेंडा येथील कार्यालयात तुर उत्पादकांनी नाव नोंदणीसाठी अर्ज भरुन द्यावेत.

शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदल्यावर खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांनी केव्हा तुर आणायची याची माहिती एसएमएसद्वारे शेतकर्‍यांना दिली जाईल. तरी नेवासा तालुक्यातील तुर उत्पादकांनी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा असे किसान समृद्धी शेतकरी कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com