भेंडा गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता ?

मित्रांनीच गोळीबार नाट्य घडवून आणल्याचा पोलिसांना संशय
भेंडा गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता ?

नेवासा lतालुका प्रतिनिधीl Newasa

तालुक्यातील भेंडा येथे रविवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता कलाटणी मिळण्याची शक्यता असून घटनेतील जुन्या वादातील लोकांना अद्दल घडविण्याच्या उद्देशाने जखमी सोमनाथ तांबे यांच्या मित्रांनीच हे गोळीबार नाट्य घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे हॉलीबॉल खेळत असतांना रविवार दि.2 एप्रिल रोजी रात्री 9:20 वाजता झालेल्या गोळीबारात सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय 21 वर्षे) रा.लांडेवाडी (भेंडा) हा युवक गंभीर जखमी झालेला आहे. नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याने नेवासा पोलिसांना दिलेल्या जबाब व फिर्यादीत पप्पू जावळे व गणेश पुंड यांचे सारखीच शरीरयष्टी असलेल्या इसमाने माझ्यावर पिस्तुल सारख्या शस्राने फायर केल्याचा संशय व्यक्त करून या दोन संशयित इसमाविरुद्ध फिर्याद दिली दिली.त्यावरून पोलिसांनी या दोन संशयितांवर कलम 307 प्रमाणे गुन्हा नोंदवून त्यांना अटक ही केली होती.

मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सर्वबाजू तपासून पाहिल्या असता त्यातील सोमनाथचे जवळचे काही मित्रांनी जुन्या वादातील लोकांना अद्दल घडविण्याच्या उद्देशाने गोळीबार नाट्य घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे.या मित्रांच्या दबावामुळेच सोमनाथ ने संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे घेतल्याचे समजते.पोलिस खऱ्या आरोपींच्या शोधात आहेत. याबाबद अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस निरीक्षक विजय करे यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचेशी संपर्क होऊ शकला नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com