भेंड्यातील शेतकऱ्यांच्या केबल-मोटारी चोरीचे सत्र थांबेना

भेंड्यातील शेतकऱ्यांच्या केबल-मोटारी चोरीचे सत्र  थांबेना

भेंडा |वार्ताहर| Bhenda

भेंडा परिसरातील (Bhenda) शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी (Water Pump) व केबल चोरीचे (Cable thief) गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले सत्र थांबेना आणि पोलिसांना तपास लागेना असा प्रकार सुरू असल्याने शेतकरी त्रस्त (Farmers suffer) झाला आहे.

दि.9 जूनच्या मध्य रात्री भेंड्यातील सुमारे 25 शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या केबलची चोरी झाली होती. यापूर्वी ही अनेक वेळा असा चोऱ्या झालेल्या आहेत.पोलिसांना (Police) त्याचा तपास अद्याप लागलेला नाही.

अशातच शनिवार दि.26 जून रोजी भेंड्याचे माजी उपसरपंच अशोकराव वायकर यांची 7.5 hp पाणबुडी मोटार (अंदाजे किंमत 18 हजार रुपये) व 60 फूट केबल (अंदाजे किंमत 2 हजार रुपये) असा मुद्देमाल चोरीला गेला आहे. शेतकऱ्यांची केबल व मोटार चोरांना पकडून जेरबंद करण्याचे मोठे आव्हान नेवासा पोलिसांसमोर (Newasa Police) उभे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com