भेंडा खुर्द येथील शेतकर्‍याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

भेंडा खुर्द येथील शेतकर्‍याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील भेंडा खुर्द येथील एका शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. रावसाहेब दगडू नवले (वय 45) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याने नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून मयत रावसाहेब नवले यांनी शनिवार दि.31 डिसेंबर रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण समजले नसले तरी मयताच्या नातेवाईकांनी रावसाहेब नवले यांनी कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

रविवार दि. 1 जानेवारी रोजी सकाळी घटनेची माहिती समजताच कुकाणा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तापासणीसाठी दाखल केला. उत्तरीय तपासणीनंतर दुपारी भेंडा खुर्द येथे मयत रावसाहेब यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी नेवासा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com