भेंड्यातील कोविड सेंटरच्या ऑक्सिजन पुरवठाकरिता ‘यांनी’ दिली देणगी

भेंड्यातील कोविड सेंटरच्या ऑक्सिजन पुरवठाकरिता ‘यांनी’ दिली देणगी

भेंडा |वार्ताहर| Bhenda

येथील कावीळ उपचार केंद्राकडून शासकीय कोविड केअर सेंटरच्या ऑक्सिजन पुरवठा प्रणालीकरिता एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली.

भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा भक्त निवासमध्ये सुरू असलेल्या शासकीय कोविड सेंटर मध्ये सध्या 200 करोना रुग्ण उपचार घेत आहेत.तहसीलदार रुपेश सुराणा व आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी या कोविड केअर सेंटर मधील सोई-सुविधेसाठी दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन दै. सार्वमतच्या माध्यमातून केले होते.

त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत भेंडा येथील कावीळ उपचार केंद्राचे कावीळ उपचार तज्ञ रामचंद्र वाबळे व सुनील वाबळे यांनी या कावीळ उपचार केंद्राचे संस्थापक त्यांचे पिताश्री दिवंगत अण्णासाहेब वाबळे यांचे स्मरणार्थ भेंडा येथील शासकीय कोविड केअर सेंटर मधील एकाच वेळी किमान 10 रुग्णांना ऑक्सिजन लावता यावा यासाठी लागणारी ऑक्सिजन पुरवठा प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी एक लाख रुपयांची रोख देणगी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांचे कडे सुपूर्द केली.

यावेळी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ.रामेश्वर शिंदे, बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजी शिंदे, सुनील गव्हाणे, राजेंद्र चिंधे, नंदकुमार गव्हाणे आदी उपस्थित होते.

अज्ञाताकडून 10 पोते गहू-तांदूळ...

तहसीलदारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एका अज्ञात व्यक्तीने नाव सांगू नका अशी अट घालून कोविड सेंटर मधील रुग्णांच्या जेवन व्यवस्थे करिता 10 पोते गहू व 10 पोते तांदूळ मदत स्वरूपात दिले. मदत ही अगदीच रोख स्वरूपात केली पाहिजे असे नाही तर ज्याला जी जी शक्य आहे ती ती मदत करावी.अगदी धान्य, तेल, मिरची-कांदे-बटाटेसह भाजीपाला, किराणा, मास्क, सॅनिटायझर, साबणी, स्टीमर, ऑक्सिमीटर या स्वरूपात मदत केली तरी चालेल असे तहसीलदार श्री.सुराणा यांनी यावेळी सांगितले. शक्य असेल त्यांनी कोविड सेंटर मध्ये श्रमदान ही करावे असे ही सुराणा म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com