भेंड्यात घरफोडी; 55 हजारांचा ऐवज लंपास

भेंड्यात घरफोडी; 55 हजारांचा ऐवज लंपास

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील अंगणवाडी सेविका रंजना उत्तम खरात यांच्या राहत्या घराचा बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी रात्री घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंगणवाडी सेविका रंजना खरात त्यांच्या बहिनीकडे नेवासा फाटा येथे गेल्या असता पाळत ठेवून अज्ञात चोरट्यांनी 11 मे रोजी सायंकाळी 5 ते 12 मे रोजी सकाळी 6 या दरम्यान त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटाची उचकापाचक करुन मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.

यात 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, सॅमसंग कंपनीचा 15 हजार रुपये किंमतीचा 42 इंची एलईडी टिव्ही, 20 हजार रुपये रोख रक्कम व 5 हजार रुपये किंमतीचा पॅनासॉनिक कंपनीचा मोबाईल असा एकूण 55 ते 60 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

अंगणवाडी सेविका रंजना खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरिक्षक बाजीराव पोवार यांनी कुकाणा दुरक्षेत्र पोलिसांना चोरीच्या घटनेचा तपास लावण्याचा आदेश दिला असून नगर येथील पोलीस पथकानेही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. लवकरच चोरट्यांना जेरबंद करु असा विश्वास तपासी हवालदार बाबासाहेब कोळपे यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.