भेंडा शिवारात भरदिवसा धाडसी घरफोडी

7 तोळे सोन्यासह 4 लाखाचा ऐवज लंपास
भेंडा शिवारात भरदिवसा धाडसी घरफोडी

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील भेंडा (Bhenda) शिवारात भरदिवसा धाडसी चोरी (Daring Theft) झाली असून अज्ञात चोरट्यांनी एकनाथ खराडे यांच्या घरातून 7 तोळे सोन्यासह (Gold) 75 हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना काल बुधवार दि. 12 जानेवारी रोजी दुपारी 4.30 चे दरम्यान घडली आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी की, भेंडा शिवारातील हरिहरनगर (Hariharnagar) परिसरात कुकाणा-देवगाव रस्त्यालगत (Kukana-Devgav Road) रहाणारे शेतकरी एकनाथ खराडे यांचे घराच्या बंद दरवाजाचा कोंयडा तोडुन अज्ञात चोरट्यांनी घरातून अंदाजे 7 तोळे सोन्याचे दागीने (Gold Ornaments) व रोख रुपये 75 हजार रुपये लंपास केले.

यामध्ये सुनिता एकनाथ खराडे यांचे स्वतःचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर, साडेचार ग्रॅमचे सोन्याचे वेल (2 जोड), 3 तोळ्याची सोन्याची पोत, 2 तोळ्याचे नेकलेस आणि रोख 75 हजार रुपये असा एकूण जवळपास चार लाख रुपये किंमतीचा ऐवज कपाटातून चोरीस गेला.

एकनाथ खराडे यांचे घरा लगतच असणार्‍या अनिता अर्जुन खराडे या घरातच होत्या. दरवाजा उघडल्याचा आवाज आला. परंतु त्यांच्या घरचेच कुणी असेल असे वाटल्याने शंका आली नाही. अवघ्या 10 मिनीटात कपाटे उचकुन काळ्या दुचाकीवरुन दोघेही पसार झाले. सुनिता व एकनाथ खराडे त्यांच्या घरचे सर्वजण शेतात काम करत होते. नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) याबाबत तक्रार दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com