भेंडा बुद्रुक येथे उद्यापासून आठ दिवसांचा कडक जनता कर्फ्यु

सरपंच वैशाली शिंदे यांची माहिती
File Photo
File Photo

भेंडा lवार्ताहरl Bhenda

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीत उद्या शनिवार दि. 22 मे पासून 30 मे 2021 पर्यंत या आठ दिवसांचा कडक जनता कर्फ्यु लागू करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन केल्यास होणार दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येणार आल्याची माहिती निर्मलग्राम भेंडा बुद्रुकच्या सरपंच वैशाली शिवाजीराव शिंदे यांनी दिली.

अधिक माहिती देतांना सौ.शिंदे म्हणाले, नेवासा तालुक्यात रुग्ण संख्या वाढ आहे तशी ती भेंडा गावात ही वाढत आहे.परंतु साखर कारखाना सुरू असल्याने संपूर्ण गाव लॉक डाऊन करता येत नव्हते.आता शेतकऱ्यांच्या सर्व ऊसाचे गाळप होऊन कारखाना ही बंद झालेला असल्याने करोनाची चैन ब्रेक करण्यासाठी किमान आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यु लागू करणे गरजेचे झालेले. त्यामुळेच भेंडा बुद्रुक गावातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवार दि.22 ते रविवार 30 मे पर्यंत आठ दिवसांचा कडक जनता कफ्युऀ लागु करण्यात आला आहे.सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, शक्यतो या आठ दिवस घराबाहेर पडून नये असे आवाहन भेंडा बुद्रुक ग्रामपंचायती कडुन करण्यात आले आहे.

या कालावधीत बसस्थानक परिसरात किंवा रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

या जनता कर्फ्यु दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दवाखाने व औषध दुकाने वगळता गावातील इतर सर्व दुकाने 100 टक्के बंद राहणार आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विषयक साहित्य,खते, बियाणे इ. साहित्य दोन दिवसांच्या आत घेऊन जावे लागणार आहे.

दुध संकलन सकाळी 6 ते 9 व संध्याकाळी 6 ते 9 कालावधीतच चालू राहील. मासे, अंडी, मटण विक्रेत्यांनी मोबाईल, हॉटस्अपवर ऑर्डर घेऊन घरपोच सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर कालावधी मधे कोणीही नियमांचा भंग केला तर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल. पुन्हा नियम मोडला तर दुसऱ्यांदा हाच दंड 5 हजार रुपये आकारण्यात येणार आहे. पिठाची गिरणी नियमानुसार चालू राहील.

नागरिकांनी आठ दिवस पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मृतांची संख्या वाढली आहे. करोना सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन भेंडा बुद्रुक ग्रामपंचायती कडुन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com