
शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
भायगाव येथील रामनाथ आबाजी झेंडे यांच्या मालकीच्या गावरान गायीचा लंपी सदृश आजाराने उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यामुळे परिसरासह तालुक्यातील शेतकरी पशु पालकांत, चिंतेचे व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भायगाव येथील गावरान गायीच्या मृत्युच्या घटनेमुळे तालुक्यात जनावरांवरील लम्पी सदृश संसर्गजन्य आजाराच्या तालुक्यातील जनावरांच्या पहिल्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले. तालुक्यात गाय प्रवर्गातील जनावरांची संख्या 72 हजारांच्या दरम्यान, असून तालुक्यात गुरुवारअखेर 62 हजार 691 जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. चारुदत्त असलकर यांनी दिली. भायगाव येथे साथीच्या या आजाराच्या पहिल्या जनावराची मृत्यूची नोंद झाल्याने शुक्रवारी गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.असलकर, दहीगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. महेंद्र लाड, भातकुडगाव येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. लक्ष्मण नाईक व त्यांच्या सहकार्यांनी भायगाव परिसरातील विविध गावांना भेटी देऊन गेल्या.
काही दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या व औषधोपचारानंतरही प्रतिसाद देत नसलेल्या जनावरांची माहिती घेतली. अधिक उपचाराबाबत संबंधितांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. तसेच गावागावातील शेतकरी व पशुपालक यांचे प्रबोधन करून जनावरांवरील साथीच्या आजाराचा परिसरात प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत संबंधितांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. मितीच्या पशुसंवर्धन विभागातून देण्यात आली. तालुक्यात श्रेणी 1 चे 5 तर श्रेणी 2 चे 9 असे एकूण 14 पशुवैद्यकीय दवाखाने असून पशुसंवर्धन विभागाचे 35 अधिकारी कर्मचारी तालुक्यात जनावरांची ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी परिश्रम घेत आहेत.