भवर नदीला पूर; पाटोदा येथील कच्चा पुल गेला वाहुन

भवर नदीला पूर; पाटोदा येथील कच्चा पुल गेला वाहुन

जामखेड | तालुका प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील व नव्याने होत असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ते जामखेड या राष्ट्रीय महामार्गावरील पाटोदा (ग.) गावाजवळ असलेल्या भवर नदीला मोठ्या पूरामुळे या ठिकाणी करण्यात आलेला तात्पुरता कच्चा पुल वाहुन गेला आहे.

त्यामुळे जामखेड ते श्रीगोंदा रस्ता बंद झाला असून या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन धारकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा अशा सुचना जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिल्या आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ते जामखेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. जामखेड तालुक्यातील पाटोदा (गरडाचे) याठिकाणी भवरवाडी पुलाचे नवीन काम चालू असल्याने बाजुला नदीमध्ये संबंधित ठेकेदाराने तात्पुरता कच्चा पुल तयार केला आहे. मात्र पावसाळ्यात या नदीला मोठा पाऊस झाल्यानंतर या नदीला मोठा पुर येतो. त्यामुळे या ठिकाणी मोठा पुल बांधवा अशी माहिती ठेकेदारास ग्रामस्थांनी दिली होती. मात्र ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्याचा असा आरोप पाटोदा येथील ग्रामस्थांनी केला आहे.

तयार करण्यात आलेला कच्चा पुल दि ६ रोजी रात्री च्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने वाहुन गेला. सदर पुल वाहुन गेल्याने जामखेड ते श्रीगोंदा वाहतुक बंद पडली. तसेच विद्यार्थीना जामखेड व अरणगाव याठिकाणी शाळेत जाण्यासाठी देखील आडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने या ठिकाणी तात्पुरता मोठा पुल तयार करून वाहतुक सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

भवर नदीला नदीला मोठा पुर असल्याने कोणीही नदीतून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये. सध्या जामखेड कर्जत व श्रीगोंदा या ठिकाणी जाण्यासाठी पाटोदा- खामगाव- फक्राबाद -कुसडगाव -जामखेड या मार्गाचा वापर करावा असे आवाहन पाटोदा गरडाचे माजी सरपंच गफ्फार पठाण यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com