घाटमाथ्यावर मान्सून सक्रिय, भावली निम्मे भरले !

दारणा 46 टक्के भरले
घाटमाथ्यावर मान्सून सक्रिय, भावली निम्मे भरले !
File Photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

मुंबईला पाऊस (Mumbai Rain) सुरु असल्याने दारणाच्या पाणलोटातील (Darna watershed) इगतपुरी (Igatpuri), घोटी (Ghoti) परिसरात सह्यद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचे मध्यम स्वरुपाचे आगमन झाले आहे. दारणाचासाठा (Darna Storage) 46 टक्क्यांवर पोहचला आहे तर भावली (Bhavli) 51.50 टक्के भरले आहे. काल रविवारी सायंकाळी दारणाच्या पाणलोटात (Darna watershed) आभाळ चांगलेच भरुन आले होते. त्यामुळे पुढील आठवडाभरात धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.

काल दिवसभरात तासभर पाऊस झाला. यंदा पावसाने गेल्यावर्षी दारणात (Darna) कालच्या तारखेला 4 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा तयार झाला होता. काल या धरणात सव्वा तीन टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सर्वच धरणांची हीच स्थिती आहे. काल दोन दिवसांपासुन दारणाच्या पाणलोटात पावसाने आगमन केले आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी येथे 48 मिमी, घोटीला 24 मिमी पाऊस झाला. काल सकाळी 6 पर्यंत दारणा धरणात 21 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. 7149 दलघफू क्षमतेच्या या धरणात 3286 दलघफू पाणीसाठा झाला होता. हे धरण 45.96 टक्के इतके भरले आहे. शेजारील भावली निम्म्याहुन अधिक भरले आहे. 1434 दलघफू क्षमतेच्या भावलीत 739 दलघफू पाणीसाठा आहे. हे धरण 51.50 टक्के भरले आहे. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत भावलीला 40 मिमी पावसाची नोंद झाली. भाम धरणाच्या परिसरात 18 मिमी, वाकीला 4 मिमी पाऊस झाला.

गंगापूरचा पाणीसाठा (Gangapur Water Storage) स्थिर आहे. या धरणाच्या परिसरात पाणीसाठ्यात नवीन पाणी दाखल होईल असा पाऊस झालेला नाही. मात्र काल सकाळी संपलेल्या 24 तासांत या धरणाच्या पाणलोटातील त्र्यंबकला 12 मिमी, अंबोलीला 28 मिमी पाऊस झाला.5630 दलघफू क्षमतेच्या गंगापूर मध्ये काल सकाळी 1846 दलघफू पाणीसाठा आहे. 32.78 टक्के पाणीसाठा या धरणात आहे. अन्य धरणांचे साठे असे- मुकणे 23.98 टक्के, भाम 10.16 टक्के, वालदेवी 66.28 टक्के, कश्यपी 16.68 टक्के, गौतमी गोदावरी 12.01 टक्के, कडवा 13.50 टक्के, आळंदी 5.65 टक्के, असे साठे आहेत. आठवडा भरात चांगला पाऊस होईल असा जाणकारांचा अंदाज आहे. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत ब्राम्हणगाव 54 मिमी पावसाची नोंद झाली. इतरत्र मात्र पाऊस नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com