भावली 40 टक्क्यांवर !

24 तासांत 94 मिमी पाऊस, दारणा, गंगापूरला हलक्या सरी
File Photo
File Photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

भावली धरणाच्या पाणलोटात (Bhavali Dam watershed) काल सकाळी संपलेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस (Heavy rain) झाला. त्यामुळे नविन पाण्याची आवक होत असल्याने भावली (Bhavali) 40.20 टक्क्यांवर पोहचले आहे. अन्य धरणांच्या पाणलोटात व गोदावरी कालव्यांच्या (Godavari Kalwa) लाभक्षेत्रात पावसाच्या हलक्या सरी दाखल झाल्या होत्या.

काल सकाळी 6 वाजेपर्यंत मागील 24 तासांत भावलीच्या भिंतीजवळ 94 मिमी पावसाची नोंद झाली. तेथे 1 जूनपासून 845 मिमी एवढा पाऊस पडला आहे. दारणाच्या पाणलोटात (Darna watershed) इगतपुरीला 25 मिमी पाऊस झाला. तेथे 1 जूनपासून 677 मिमि पावसाची नोंद झाली. तर घोटीला अवघा 1 मिमी पाऊस नोंदला गेला. तेथे 1 जून पासून 394 मिमी पावसाची नोंद झाली. तर दारणाच्या भिंतीजवळ 2 मिमी पावसाची नोंद झाली.

एकूण 192 मिमी पाऊस भिंतीजवळ नोंदला गेला. दारणात (Darna) काल सकाळी 6 पर्यंत 43.29 टक्के पाणीसाठा (Water Storage) तयार झाला आहे. एकूण 3095 दलघफू पाणीसाठा असून मागील वर्षी याच तारखेला या धरणात 3019 दलघफू इतका साठा होता. गंगापूरच्या पाणलोटात (Gangapur watershed) किरकोळ पाऊस आहे. धरणाच्या साठ्यात वाढ होईल इतपत पाऊस अद्याप पडलेला नाही. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 20 मिमी पावसाची नोंद झाली. पिण्यासाठी वापर होत असल्याने 37 टक्क्यांवरून हा साठा 36 टक्क्यांवर आला आहे.

गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात राहाता (Rahata) येथे 3 मिमी व देवगाव येथे 8 मिमी इतका पाऊस वगळता इतर ठिकाणी पाऊस नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com