भावली पाठोपाठ वालदेवी फुल्ल !

गोदावरीतील विसर्ग स्थिर, गंगापूरचा विसर्ग 2090 क्युसेकवर
भावली पाठोपाठ वालदेवी फुल्ल !

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

भावली (Bhavali) पाठोपाठ वालदेवी धरणही (Waldevi Dam) 100 टक्के भरले. या धरणातुनही विसर्ग सुरु झाला आहे. दारणातील (Darna) विसर्ग 5540 क्युसेकने टिकून आहे. तर गंगापूरचा (Gangapur) विसर्ग घटविण्यात आला आहे. हा विसर्ग 3068 क्युसेकवरुन 2090 क्युसेक इतका करण्यात आला आहे. तर नांदूरमधमेश्वर (Nandurmadhameshwar) बंधार्‍यातुन जायकवाडीच्या (Jaykwadi) दिशेने गोदावरीतील (Godavari) विसर्ग 9667 क्युसेकवर स्थिर आहे.

काल दिवसभरात अधुन मधून पावसाची रिपरिप धरणक्षेत्रात सुरु होती. पावसाचा जोर काहिसा ओसरला आहे. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत गंगापूर (Gangapur), दारणाच्या पाणलोटात (watershed of Darna) हालक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दारणाच्या भिंतीजवळ 6 मिमी, पाणलोटातील इगतपुरीला (Igatpuri) 29 मिमी, घोटीला (Ghoti) 27 मिमी पावसाची नोंद झाली. भावलीच्या पाणलोटात (watershed of Bhavli) 30 मिमी पावसाची नोंद झाली. भावलीतून 290 क्युसेकने विसर्ग दारणात दाखल होत आहे. 24 तासांत दारणात 291 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. दारणात पाणी दाखल होत असल्याने दारणाचा विसर्ग 5540 क्युसेकवर स्थिर आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल मध्यम पाऊस झाला. सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत गंगापूर च्या भिंतीजवळ 25 मिमी, त्र्यंबकला 27 मिमी, अंबोली ला 34 मिमी असा पाऊस नोंदला गेला. 24 तासात गंगापूर मध्ये 162 दलघफू नविन पाणी दाखल झाले. गंगापूर मधुन 3068 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. मात्र पावसाचा जोर ओसरल्याने हा विसर्ग काहिसा घटविण्यात येवुन तो सायंकाळी 6 वाजता 2090 क्युसेक इतका करण्यात आला होता.

गंगापूरचा साठा (Gangapur Water Storage) 78.28 वरुन काल पाच वाजता 77.77 टक्क्यांवर आला होता. काल दिवसभरात सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत गंगापूरच्या पाणलोटात गंगापूरला अवघा 3 मिमी, कश्यपीला 9 मिमी, गौतमीला 4 मिमी, त्र्यंबकला 9 मिमी, आंबोली 10 मिमी असा पाऊस नोंदला गेला. कश्यपी धरण 46.92 टक्के भरले आहे. गौतमी 54.86 टक्के भरले आहे.

गोदावरी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातुन 9667 क्युसेक ने विसर्ग सुरु आहे. दारणा, गंगापूर मधुन सोडण्यात येणारा विसर्ग आणि नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या मुक्त पाणलोटातील पावसाचे पाणी यामुळे गोदावरीतील विसर्ग टिकून होता.

Related Stories

No stories found.