माजी आमदारांची ‘ती’ नौटंकी होती काय- तिकांडे
भानुदास तिकांडे

माजी आमदारांची ‘ती’ नौटंकी होती काय- तिकांडे

अकोले |प्रतिनिधी| Akole

सुगाव कोविड सेंटरच्या उद्घाटनानंतर तालुक्याचे लोकप्रतिनिधी स्टंटबाजी करतात, अशी टीका करणार्‍या माजी आमदारांची मग काय नौटंकी होती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी माजी आमदार वैभव पिचड यांचे नाव न घेता केला आहे.

सुगाव येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनानंतर माजी आमदार पिचड यांनी आ. लहामटे यांचे नाव न घेता टिकास्त्र सोडले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने मंगळवारी पत्रकार परिषदेत भुमिका मांडली. तिकांडे म्हणाले, काहींनी पद्मश्री राहीबाई पोपरे व निवृत्ती महाराज देशमुख यांच्या आडून राजकारण केले. ऐनवेळी त्यांना बोलावून जाणीवपूर्वक आमदारांच्या हस्ते उद्घाटन होऊ न देण्याचा डाव होता. आमदारांचे चांगले काम पहावत नाही म्हणून कालची नौटंकी होती. आमदारांचा बाप काढण्याचा प्रयत्न झाला, आम्हालाही बाप काढता येईल पण ती आमची संस्कृती नाही.

ज्येष्ठ नेते संपतराव नाईकवाडी यांनी तालुक्याची वेगळी ओळख व संस्कृती आहे. दोन्ही नेतृत्वांनी सद्सद्विवेकाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. महिलाध्यक्षा स्वाती शेणकर म्हणाल्या, अकोले तालुक्यात आमदार डॉ. लहामटे चांगले काम करत आहेत. खरी स्टंटबाजी कोण करत आहेत हे लोक पाहत आहेत. यावेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे, ज्येष्ठ नेते सुरेश गडाख, संपतराव नाईकवाडी, अरुण रुपवते, महिला तालुकाध्यक्षा स्वाती शेणकर, प्रा. सी. एम. नवले, विकास बंगाळ, ईश्वर वाकचौरे, विकास वाकचौरे, अमित नाईकवाडी, संदीप शेणकर, हरीश माने आदी उपस्थित होते.

प्रश्नांचा भडीमार

‘बेटे तेरे बस की बात नही, तेरे बाप को भेज’ यापूर्वी बाप काढण्यात आला होता, ही तुमची संस्कृती होती का? आमदार उदघाटनासाठी एव्हढे उतावीळ का झाले? कोविड सेंटरला किती निधी रोख स्वरूपात देणार? अशा एक ना अनेक प्रश्नांच्या सरबत्ती यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांवर झाली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com