‘क’ वर्ग दर्जा प्राप्तीनंतर भास्करगिरी महाराज यांची स्वामी परमानंद मठास भेट

‘क’ वर्ग दर्जा प्राप्तीनंतर भास्करगिरी महाराज यांची स्वामी परमानंद मठास भेट

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

खेडलेपरमानंद येथील शिवभारतकार कविंद्र परमानंद यांच्या ऐतिहासिक मठास ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच श्रीक्षेत्र देवगडचे भास्करगिरी महाराज यांनी स्वामी परमानंद बाबांच्या समाधीस्थळी भेट दिली. ग्रामस्थांनी महाराजांचे स्वागत केले. गावातील महिलांनी स्वागतासाठी संपूर्ण गावात सडा-रांगोळी केली होती.

स्वामी परमानंद बाबा मठ विश्वास्त मंडळाच्या विनंतीला मान देऊन भास्करगिरी महाराज यांनी खेडले परमानंदला सदिछा भेट दिली. यावेळी अन्साराम महाराज मिसाळ परमानंद गड आंबळनेर, दत्तात्रय बहिरट महाराज, आबा मुळे (नेवासा), स्वामी परमानंद बाबा मठ ट्रस्ट संस्थापक व अध्यक्ष किशोर फकीरा केदारी, उपाध्यक्ष प्रल्हाद आंबिलवादे, नानासाहेब गायकवाड, विजय शिंदे, विश्वस्त आशोक शिंदे, कृण्णा राऊत, प्रंदिप गोसावी, संभाजी बर्डे, संतीश बर्डे, अशोक ब्राम्हणे, मोसिम शेख, दौलतगिरी मोकाशी, सरपंच राजेंद्र राजाळे, तंटामुक्ती आध्यक्ष दगुबाबा हवालदार, राजेद्र बर्डे सूर्यकांत केदारी, संदीप केदारी, मुळा कारखाना अध्यक्ष नानासाहेब तुवर आदींसह भाविक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

‘शिवभारत’ आद्य शिवचरित्र

काशी वरून पांडित्य मिळवून आलेल्या परमानंद यांचे प्रभुत्व पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना कवींद्र ही उपाधी दिली. राजांच्या आदेशानुसार त्यांनी शिवभारत हा ग्रंथ लिहिला. शिवचरित्रकार सदाशिव दिवेकर यांना या ग्रंथाची तमिळ प्रत सापडली. त्यानंतर तंजावर येथील संग्रहालयात मूळ संस्कृत प्रत सापडली. शिवभारत हे आद्य शिवचरित्र मानले जाते. खेडले परमानंद येथील कवी परमानंद यांना चारशे एकर जहागिरी मिळाली होती. भव्य सभामंडप, शिवमंदिर, भव्य दरवाजा, तटबंदी, पाक शाळा, ध्यान मंदिर, धान्य दळण्यासाठी मोठे जाते, दगडी रांजण, जाहागिरीतील वसुलीसाठी ‘सोट्या’ नामक एक दंड, नक्षीकाम केलेले दगडी शिल्प, अशाप्रकारे मठाची जडण घडण आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com