
नेवासाफाटा |प्रतिनिधी| Newasa
नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील श्रीराम साधना आश्रमाच्यावतीने आयोजित श्रीराम जन्मोत्सव कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ भास्करगिरी महाराजांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाने करण्यात आला. श्रीरामकथेच्या माध्यमातून अध्यात्मिक ऊर्जा निर्माण करा तसेच गावाचे वैभव असलेल्या मठ मंदिराचे पावित्र्य सांभाळा असे आवाहन भास्करगिरी महाराज यांनी यावेळी केले.
कार्यक्रम प्रसंगी आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरी महाराज शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये फत्तेपूर येथील धूळदेव देवस्थान मधील मुक्ताजी कोकरे यांचे ढोलपथक, त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे अश्व पथक, झांजपथक सहभागी झाले होते. महिलांनी डोक्यावर तुळशी कलश घेत प्रभू श्रीराम चंद्राचा यावेळी जयघोष केला. तर उपस्थित भजनी मंडळाने भजने गायली.
आश्रम प्रांगणात मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर ‘सियावर रामचंद्र की जय...’, ‘जय श्रीराम...’ असा जयघोष करत धर्मध्वज पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.
महंत रमेशानंदगिरी महाराज, गोपालानंदगिरी महाराज, विष्णूदेवानंदजी महाराज, शुक्लभारतीजी महाराज, हौसानंदपुरी महाराज, माधवानंदगिरी महाराज, सुदर्शननाथ, ऋषीनाथ महाराज, विश्वभारतीजी महाराज,महंत पंचमपुरीजी महाराज, अमृतानंद महाराज कांकरिया, कारभारी महाराज झरेकर, चैतन्य सुवर्णानंद महाराज, साध्वी अमृतानंद सरस्वती, गणपत महाराज आहेर, बाळू महाराज कानडे, लक्ष्मीनारायण जोंधळे धर्म पिठावर उपस्थित होते.
भास्करगिरी महाराज म्हणाले की राम ही शक्ती आहे, राम हे सुख आहे, राम सर्वांचा आराम आहे म्हणून श्रीरामाची साधना करणे आवश्यक आहे. रामकथा श्रवणाने मन पवित्र होते. ज्या ठिकाणी मंदिराची स्थाने निर्माण झाली आहेत तेथील मंदिराचे व परिसराचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, सरपंच सतिश निपुंगे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय घोलप, शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के, होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे, अशोक निपुंगे, नाथाभाऊ पंडीत, भिवाजी आघाव, मुरमेचे सरपंच अजय साबळे, सरपंच राजेंद्र गोलांडे, पी. आर. जाधव, पोपटराव निपुंगे, रावसाहेब घुमरे, बी. के. पवार, अशोक ढगे, रामकृष्ण कांगुणे, दत्ताभाऊ कांगुणे, विजय देऊळगावकर, बाळासाहेब भागवत, दशरथ मुंगसे, के. एम. बाबा फाटके, सीताराम निपूंगे, वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर, भाऊसाहेब निपुंगे, ज्ञानेश्वर महाराज हजारे, आडभाई महाराज, आवारे महाराज, पत्रकार सुधीर चव्हाण,चंद्रकांत कामटे, त्रिमूर्तीचे प्राचार्य सचिन कर्डीले यांच्यासह त्रिमूर्ती संकुलाचे विद्यार्थी, शिक्षक, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. अशोक गाडे व डॉ. रेवणनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.