भानसहिवरा सोसायटी निवडणुकीत उपसभापती जोजार यांच्या पॅनलने पटकावल्या सर्व जागा

भानसहिवरा सोसायटी निवडणुकीत उपसभापती  जोजार यांच्या पॅनलने पटकावल्या सर्व जागा

भानसहिवरा |वार्ताहर| Bhanashivara

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांना मानणार्‍या दोन गटात झालेल्या भानसहिवरा सोसायटीच्या निवडणुकीत पंचायत समिती उपसभापती किशोर जोजार यांच्या जनसेवा ग्रामविकास पॅनलने सर्व 13 जागांवर विजय मिळवत माजी सभापती भाऊसाहेब पटारे यांच्या गटाकडे (कविजंग शेतकरी ग्रामविकास पॅनल) जवळपास 50 वर्षापासून असलेली सत्ता खेचून घेण्यात यश मिळवले.

विजयी उमेदवार - सर्वसाधारण कर्जदार- नितीन राजेंद्र कदम (492), मुक्ताबाई त्रिंबक करडक (464), अय्याज गुलाबनबी देशमुख (510), रमेश बन्सी नळकांडे (506), दिनकर नाना निपुंगे (454), बाळासाहेब पुंजाजी भणगे (502), शरद माणिक भणगे (504) व बापूसाहेब मच्छिंद्र मोहिटे (483). महिला राखीव - अंबिका सोपान घोलप (521) व लताबाई विक्रम भणगे (525). अनु. जाती/जमाती - सुभाष सुगंध मकासरे (504). इतर मागास - रमेश पंढरीनाथ काळे (525). वि.जा.भ.ज.- सुंदरबाई सारंगधर ढवाण (548)

पराभूत उमेदवार - सर्वसाधारण कर्जदार- अशोक बाळकृष्ण कदम (355), ज्ञानेश्वर विठोबा कराडे (335), अशोक (भगवानराव ) शिवाजी जाधव (343), दादासाहेब नामदेव बर्डे (334), तुकाराम जनार्दन भणगे (352), बाबासाहेब शिवाजी भणगे (357), निसार आब्बास सय्यद (328), मुरलीधर प्रभाकर साळुंके (333). महिला राखीव - जिजाबाई चंद्रभान भणगे (400) व केशरबाई हरीभाऊ मोहिटे (364). अनुसुचित जाती जमाती - भागुबाई शाहुल मकासरे (402). वि.जा./भ.ज./वि.मा.प्र.- नानासाहेब भानुदास टाके (358). इतर मागास-ज्ञानदेव मुरलीधर जाधव (381).

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एन. जहागीरदार व त्यांना सहाय्यक म्हणून सचिव व्ही. के. आव्हाड यांनी काम पाहिले. मुकिंदपुरचे सरपंच सतिष निंपुगे, कचरु भणगे, मच्छिंद्र ढवाण, बबन भणगे, संजय भणगे, प्रविण वंजारे, तुकाराम काळे, मीरु मकासरे, रामचंद्र भणगे, विक्रम भणगे, अनिल टाके, अशोक करडक, गणेश भुजबळ, जनार्दन जाधव, शाम नरवडे, नंदु जाधव, भागंचद साळवे, संदिप पटारे, संपत पिसाळ, संदिप तळपे, शिमोन मकासरे, सुभाष बर्डे, आंबादास जाधव, संदिप हारदे यांचे सहकार्य लाभले.

शेतकर्‍यांच्या विकास कामांचे हित लक्षात घेऊन लगेच विकास कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याचे यावेळी जनसेवा ग्राम विकास पॅनलचे नेतृत्व करणारे नेवासा पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com