भंडारदरा पाणलोटात रिपरिप मुळा पाणलोटातही रिमझीम सुरू

भंडारदरा
भंडारदरा

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर|Bhandardara

-उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा धरण पाणलोटात कालपासून श्रावणसरी कोसळू लागल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. गत आठ दिवसांपासून या भागातून पावसाने काढता पाय घेतल्याने दोन्ही धरणांतील पाण्याची आवक मंदावली होती.

भंडारदरा धरण परिसर आणि पाणलोटात काल मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे काल सायंकाळी 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात 5674 दलघफू पाणीसाठा झाला होता. 8300 दलघफू क्षमतेच्या निळवंडे धरणातही 4223 दलघफू पाणीसाठा होता. भंडारदरा धरणात गत बारा तासांत 64 दलघफू नवीन पाण्याचीआवक झाली.वाकीचाही ओव्हरफ्लो सुरू झाला आहे. काल दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 15 मिमी झाली.

मुळा पाणलोटातही काल दिवसभर रिमझीम सुरू होती. त्यामुळे मुळा नदीत सकाळी 625 क्युसेक असलेला विसर्ग 1000वर पोहचला होता. आज पावसाचा वेग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास मुळा धरणातही आवक वाढण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com