
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. काल दुपारी तीन नंतरच्या तीन तासात भंडारदरा येथे 17 मि.मि. पावसाची नोंद झाली. धरणात नवीन पाण्याची आवक सुरु असून काल सायंकाळी 6 वाजता धरणाचा पाणीसाठा 2387 द.ल. घ.फू झाला होता.
पाणलोटात मान्सून सक्रीय झाला असला तरी अद्याप पावसाने जोर धरलेला नाही. मात्र पावसाची रिमझिम तसेच अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे डोंगरदर्यातून धबधबे वाहु लागले आहेत. ओढेनाले खळखळू लागल्याने हळू हळू पर्यटकांची संख्याही वाढी लागली आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 3 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या या 2387 दक्षलक्ष घनफुटावर पोहचला होता.
काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत भंडारदरात 17 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 112 दलघफू क्षमतेच्या वाकी तलावात नवीन पाण्याची आवक सुरु आहे.
गत 24 तासांत पडलेला पाऊस असा-भंडारदरात 7, घाटघर 9, पांजरे 7, रतनवाडी 7 तर वाकी 3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. लाभक्षेत्रातील अकोले शहर व परिसरात काल दुसर्या दिवशीही पावसाने जोरदार बॅटींग केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. आढळा परीसरातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.