भंडारदरातील साठा 75 टक्क्यांवर मुळा धरणात 14 टीएमसी पाणी

भंडारदरातील साठा 75 टक्क्यांवर मुळा धरणात 14 टीएमसी पाणी
Rajesh Deshpande

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

नगर जिल्ह्याची (Ahmednagar District) जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण (Bhandardara Dam) पाणलोटात काल दुपारपासून आषाढ सरी जोरदार कोसळू लागल्याने या धरणातील पाणीसाठा (Bhandardara Water Storage) 75 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. मुळा पाणलोटात (Mula Watershed) अधूनमधून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुळा धरणात 4581 क्युसेकने आवक होत आहे. ता धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 14017 दलघफू होता.

भंडारदरा धरण परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. काल दिवसभर झालेल्या पावसाची नोंद 47 मिमी झाली आहे. घाटघर (Ghatghar), पांजरे (Panjare) आणि रतनवाडीतही (Ratanwadi) पावसाचा जोर टिकून आहे. वाकी तलावातून (Waki Pond) 1022 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. अन्य ठिकाणचे पाणीही जमा होत असल्याने 8320 दलघफू क्षमतेचे निळवंडे धरण (Nilwande Dam) 37 टक्के झाले आहे. या धरणातील पाणीसाठा (Water Storage) काल सायंकाळी 2902 दलघफू झाला होता.

कोतूळ वार्ताहराने कळविले की, हरिश्चंद्र गड (Harishchandra Gad), आंबित (Ambit), पाचनई (Pachanai) भागात आषाढ सरी अधूनमधून कोसळत असल्याने मुळा नदीतील (Mula River) पाणी टिकून आहे. काल दिवसभरात धरणात नव्याने 142 दलघफू पाणी दाखल झाल्याने सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 14017 दलघफू झाला होता.

भंडारदरा : अभयारण्य परीसरात पर्यटकांना प्रवेश बंदी उठवा

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचे तांडव सुरुचं असल्याने परिसरातील निसर्ग सौंदर्य बहरु लागल्याने राज्यभरातील पर्यटक निसर्गाची मुक्त उधळण करण्यासाठी भंडारदरा परिसरात गर्दी करु लागले आहेत. मात्र शनिवार, रविवार पर्यटकांना अभयारण्य परीसरात प्रवेश बंदी असल्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

भंडारदरा परिसरात खरे निसर्ग सौंदर्य, पांजरा धबधबा, नानीफाँल, नेकलेस फाँल,कोकण कडा, सांधणदरी, हेमाडपंथी अमृतेश्वर मंदिर हे बघण्यासारखे अनेक पाँईट अभयारण्य क्षेत्रातचं आहेत व त्या निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण करण्यासाठी राज्यभरातील अनेक पर्यटकांनी चार ते पाच महिने हॉटेल, रिसाँर्ट, पर्यटन निवास येथे आगाऊ बुकिंग करुन येत असतात. मात्र इतक्या दुर येऊन पैसे खर्च करून अनेक पर्यटकांना निराश होऊन परतावे लागत असल्याने हिरमोड होत आहे. त्याच सोबत अभयारण्य क्षेत्रात ठिकठिकाणी अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी वडापाव, चहाचे स्टार उभारले आहेत तर अनेकांना वनविभाग, प्रकल्प कार्यालया मार्फत देण्यात आले आहे.

तर पर्यटकांसाठी अनेक छोटे मोठे व्यावसायिक घरगुती जेवण देखील तयार करुन देत असतात त्यांना देखील बंदचा अर्थीक फटका बसला असून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शनिवार, रविवार पर्यटन बंदी उठवून अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांना प्रवेश दिला जावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.या संदर्भात परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांच्याकडे करत वन विभागाला निवेदन दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com