भंडारदरा ९२ टक्के भरले

कुकडीत ४०० दलघफू नवीन पाणी दाखल
भंडारदरा ९२ टक्के भरले

भंडारदरा, कोतूळ (वार्ताहर)

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असल्याने ११०३९ दलघफू क्षमतेच्या या धरणात १०११४ दलघफूटावर पोहचला होता. पावसाचे प्रमाण असेच टिकून राहिल्यास हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

रतनवाडीत धो धो पाऊ झाला. या पावसाची नोंद १५६ मिमी झाली आहे. भंडारदरा ६५, घाटघर ७०, पांजरे ६९ तर वाकीत ४१ मिमी पाऊस झाला. यामुळे धरणात २१९ दलघफू पाण्याची आवक झाली असून धरणातील पाणीसाठा सायंकाळी १००९१ दलघफू झाला होता. काल दिवसभरही भंडारदरासह पाणलोटात पाऊस सुरू होता. त्यामुळे पाण्याची आवक सुरूच असून रात्री साठा १०११४ दलघफुटाच्या पुढे सरकला होता.

वाकीचा ओव्हरफ्लो वाढला असून तो ७८९ क्युसेक असून निळवंडे धरणातही पाण्याची आवक वाढली लागल्याने या धरणातील पाणीसाठा फुगू लागला आहे. मुळा पाणलोटातही पावसाचे प्रमाण टिकून असल्याने मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग ३५०० क्युसेक सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या २४ तासांत धरणात २९९ दलघफू नवीन पाण्याची भर पडली. त्यामुळे साठा २११७० दलघफू झाला होता. त्यात दिवसभर आवक सुरू असल्याने-साठा २१२०० दलघफूच्या पुढे सरकला होता.

कुकडीत ४०० दलघफू नवीन पाणी दाखल

कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोटात कमी अधिक पाऊस सुरू असल्याने काल सकाळी संपलेल्या २४ तासांत ४०० दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने या समूहातील पाणीसाठा १९७१६ दलघफू (६६.४४) टक्के झाला होता. गतवर्षी या काळात या धरणांमध्ये एकूण पाणीसाठा ७२ टक्के होता. कुकडी प्रकल्पातील पाण्याचा पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे या धरणातील साठ्याकडे या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा असतात. त्यावरच त्यांचे रब्बीच्या पिकांचे नियोजन होत असते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com