भंडारदर्‍याचे रोटेशन घेऊन श्रीरामपूर तलावात पाणी सोडावे
सार्वमत

भंडारदर्‍याचे रोटेशन घेऊन श्रीरामपूर तलावात पाणी सोडावे

अविनाश आदिक यांची जलसंपदामंत्री यांच्याकडे मागणी

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

शहरातील गोंधवणी येथील पिण्याच्या पाण्याच्या तलावात पाणी कमी झाल्याने लवकर रोटेशन घेऊन पाणी सोडावे याबाबत राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश आदिक यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. ना. पाटील यांनी तात्काळ संबंधितांना सूचना करून पाणी सोडण्याचे नियोजन करावे, असे आदेश दिले आहेत.

श्रीरामपूर शहराला गोंधवणी येथील दोन तलावांमधून पाणीपुरवठा होतो. एकदा दोन्ही तलाव भरल्यानंतर 45 दिवस पाणी पुरते. मात्र तलावामध्ये पाणीसाठा कमी झाल्याने नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पाणी सोडण्याबाबत निवेदन दिले होते.

या निवेदनाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी ना. पाटील यांची भेट घेतली. जयंत पाटील यांनी अविनाश आदिक यांच्या मागणीची सकारात्मक चर्चा करून संबंधित विभागाला पाणी सोडण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com