भंडारदरात पावसाची हुलकावणी

रतनवाडीत केवळ 14 मिमी पावसाची नोंद
File Photo
File Photo

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा पाणलोटातील घाटघर आणि रतनवाडीत काल मंगळवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने नवीन पाण्याची आवक घटू लागली आहे. गत 12 तासांत अवघे 1 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 2425 दलघफू (21.97 टक्के) पाणीसाठा झाला होता.

पाणलोटात मान्सून गत रविवारी दाखल झाला. तेव्हापासून पाऊस अद्यापही टिकून आहे. त्यामुळे आठ दिवसांत धरणात नव्याने 169 दलघफू पाणी दाखल झाले आहे. पाऊस कमी झाल्याने डोंगरदर्‍यातून वाहणारे धबधबेही गायब होऊ लागले आहेत.खळखळणारे ओढेनालेही कोरडे दिसत आहेत. काल भंडारदरात दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 5 मिमी झाली आहे.

गत 24 तासांत पडलेला पाऊस असा- भंडारदरात 8, पांजरे 9, रतनवाडी 14 तर वाकी 4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे रिव्हर्स, पांजरे तसेच अन्य फॉलचे सौंदर्य खुलू लागलेले असतानाच हे फॉलही लुप्त झाले आहेत.

पावसाची हुलकावणी

समुहात 5050 दलघफू पाणी होते. यादिवशी गतवर्षी या समुह धरणांत 17 टक्के पाणी होते तर यंदा केवळ 6 टक्के पाणी आहे. या पाणलोटात जोरदार पाऊस न बरसल्यास शेतकर्‍यांपुढे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

7 हजार 231 पोलीस भरती

100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत.तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.

शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. पोलीस

कुकडी : 106 दलघफू नवीन पाणी दाखल

दक्षिण नगर जिल्ह्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या कुकडी प्रकल्पाच्या पाणलोटात अधूनमधून सरी कोसळत असल्याने धरणात धिम्या गतीने आवक सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 106 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. या धरणांतील एकूण पाणीसाठा 1794 दलघफू झाला होता. यंदा खूपच कमी पाणीसाठा आहे. कारण गतवर्षी याच काळात या (पान 6 वर)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com