भंडारदरा यंदा 15 ऑगस्टचा मुहूर्त साधणार?
सार्वमत

भंडारदरा यंदा 15 ऑगस्टचा मुहूर्त साधणार?

आशा पल्लवित : पाणलोटात पावसाचा जोर वाढला

Arvind Arkhade

भंडारदरा|वार्ताहर|Bhandardara

घाटघर व कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत 104 दलघफू नवीन पाण्याची आवक होऊन भंडारदरा धरणाचा जलसाठा 6 हजार 999 दलघफू झाला होता. पावसाचा जोर वाढल्याने 15 ऑगस्टपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मध्यंतरी पावसाने ताण दिल्याने पाण्याची आवक मंदावली होती. त्यामुळे धरणसाठ्याबद्दल चिंता वाढली होती. दरम्यान, मुळा धरणातील जलसाठा 13 हजार 382 दलघफू तर निळवंडेतील जलसाठा 4 हजार 563 दलघफू नोंदविला गेला.

भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात मनसोक्त बरसणार्‍या वरुण राजाने जिल्ह्यातील मोठ्या धरणात जेमतेम हजेरी लावली होती. त्यामुळे लाभक्षेत्रात चैतन्य तर पाणलोटात चिंता असे विरोधाभासी चित्र काही दिवसांपासून निर्माण झाले होते. मात्र दोन दिवसांत हे चित्र बदलले असून राज्याची पावसाची चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघर व कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे.

काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत 104 दलघफू नवीन पाण्याची आवक होवून भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 6 हजार 999 दलघफू झाला होता. दरम्यान, मुळा धरणातील जलसाठा 13 हजार 382 दलघफू तर निळवंडेतील जलसाठा 4 हजार 563 दलघफू नोंदविला गेला.

परिसरातील पावसाची सरासरी पाहता सामान्य दिवसातील निम्मा असला तरीही चालु हंगामात पहिल्यांदा मुसळधार जलघारा कोसळल्याने परीसरातील आदिवासी बांधवाचे चेहरे खुलले आहेत. गेल्या दोन महिन्यापुर्वी राज्यावर कोसळलेल्या निसर्ग चक्रीवादळाने वेळेत दाखल झालेल्या मान्सूनच्या नियमितेत बाधा निर्माण केली.

त्यामुळे चांगली सुरुवात करणारा मान्सून पाणलोटातून जवळपास गायब झाल्याचे दृश्य होते. आषाढी एकादशीपर्यंत अपवाद वगळता ओढ देणार्‍या मान्सूनमुळे पाणलोटातील चिंता वाढल्या होत्या, मात्र त्याचवेळी लाभक्षेत्रातील बहुतेक सर्व तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने धुव्वाधार पावसाचे आगार असलेले धरणाचे पाणलोट कोरडे तर जेमतेम पावसाच्या लाभक्षेत्रातील तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस असे विरोधाभासी चित्र ही गेल्या दोन महिन्यात पहायला मिळाले.

पाणलोटातील पावसाला जोर नसल्याने भात उत्पादक आदिवासी बांधवांच्या चेहरा वरील रेषा ही गडद झाल्या होत्या मात्र शततारका नक्षत्र आरंभापासून राज्यातील किनारपट्टी सह जिल्ह्यातील धरण क्षेत्रात धुव्वाधार पावसाचे आगमन झाले. गेल्या दोन दिवसांत जेमतेम बरसणार्‍या वरुण राजाने गुरुवारी दुपारनंतर भंडारदरा पाणलोटातील घाटघर, रतनवाडी, पांजरे परीसरात जोरदार हजेरी लावली एकसारख्या कोसळणार पावसामुळे ओढ्यानाल्यांना नवसंजीवनी मिळाली आणि सह्याद्रीच्या कडेकपारीतून असंख्य ओहळ धरणीच्या दिशेने झेपावू लागले.

गेल्या चोवीस तासांपासून या परिसरातील पावसाचा जोर कायम असल्याने मागील चोवीस तासात 258 दलघफु नवीन पाणी दाखल झाली आहे. तर पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिला तर भंडारदरा धरण 15 ऑगष्टपुर्वी भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com