भंडारदरात पावसाचा जोर, मुळा 81 टक्के

भंडारदरात पावसाचा जोर, मुळा 81 टक्के

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल श्रावणसरी कोसळल्याने डोंगरदर्‍यावरील धबधबे पुन्हा सक्रिय झाले असून ओढेनाले खळखळू लागले आहेत. गत बारा तासांत धरणात 133 दलघफू पाणी नव्याने आल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा सायंकाळी 9509 दलघफू (86.14टक्के) झाला होता. दरम्यान दिवसभर भंडारदरात पाऊस सुरू होता. या पावसाची नोंद 21 मिमी झाली आहे. दरम्यान, रात्री भंडारदरात पावसाचा जोर वाढला होता.

मंगळवारी दुपारनंतर पाणलोटात पावसाने काहीसा जोर पकडला होता. त्यामुळे धरणात नव्याने पाण्याची आवक वाढली आहे. . निळवंडे धरणातही पाण्याची चांगली आवक होत आहे. सायंकाळी 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 7408 दलघफू झाला होता. मुळा पाणलोटात पावसाचा जोर टिकून असल्याने मुळा नदीतील विसर्ग काल मंगळवारी सकाळी 1873 क्युसेकपर्यंत होता. तो सायंकाळी 2984 क्युसेक झाला होता.धरणात आवक वाढल्याने मुळा धरणातील पाणीसाठा 20921 दलघफू (80.46 टक्के) झाला होता.

बोरी तलाव ओव्हरफ्लो

अकोले तालुक्यातील कोतुळ, बोरी, भोळेवाडी या तीन गावांना शेती आणि पिण्याचे पाण्याची तहान भागविणारा बोरी पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला. हा तलाव भरल्याने परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे 47 दलघफू क्षमतेचा हा तलाव तीन गावांची तहान भागवितो. या तलावामुळे बोरी गावचे मोठे क्षेत्र ओलिताखाली येते. दरवर्षी शेतकरी नियोजन करून या पाण्याचा सदुपयोग करतात असे बोरीचे सरपंच संजय साबळे यांनी सांगितले.

धरणसाठे -

भंडारदरा- 9509 दलघफू | विसर्ग 830 क्युसेक

निळवंडे - 7379 दलघफू | विसर्ग 690 क्युसेक

मुळा- 20820 दलघफू | आवक 1873 क्युसेक

साठा (टक्के)

येडगाव 50.84

माणिकडोह 59.13

वडज 91.51

डिंभे 83.48

घोड 87.37

पाऊस-(मिमी)

भंडारदरा- 15

घाटघर- 58

रतनवाडी- 16

वाकी- 09

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com