भंडारदरा पाणलोटात धो-धो पाऊस

भंडारदरा पाणलोटात धो-धो पाऊस

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात काल बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. हे धरण तुडूंब असल्याने येणारी आवक नदीपात्रात सोडण्यात येत आहे.काल रात्री अचानक पावसास जोरदार सुरूवात झाली.

त्यानंतर काही वेळातच पावसाने जोर धरला. ओढे नाले खळखळत धरणात सामावत होते. त्यामुळे धरणातून विसर्ग सोडण्यात येत होता. पाणलोटात पाऊस सुरू असल्याने धरणातून प्रवरा नदी पात्रात पाणी येत आहे. हे पाणी निळवंडेत येत असून या धरणातूनही खाली प्रवरा नदीत विसर्ग वाढविण्यात येण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com