भंडारदरा पाणलोटात मान्सून दाखल

पावसाचा जोर वाढण्याचे संकेत
भंडारदरा पाणलोटात मान्सून दाखल

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात मान्सून काल रविवारी दाखल झाल्याचे संकेत मिळत असून या परिसरात काल सायंकाळी पाच वाजेपासून अधूनमधून सरी कोसळत आहेत.

पाणलोटातील वातावरण दुपारनंतर बदलले. ढगांची गर्दी होऊ लागली नी सायंकाळी पावसास सुरूवात झाली. पावसाचा जोर नसलातरी दोन-तीन दिवसांत जोर वाढण्याची शक्यता शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान सायंकाळी 5 ते 6 या वेळेत पडलेल्या पावसाची नोंद 7 मिमी झाली आहे. त्यानंतरही अधूनमधून सरी कोसळत होत्या. त्यामुळे पाणलोटात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. यंदा काहीसा उशीरा मान्सून दाखल झाला आहे. पण तो पडता झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा बळावल्या आहेत. भंडारदरा पाणलोटात किती पाऊस पडतो यावर उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकरी पिकांचे नियोजन करीत असतो. कारण या धरणातील पाण्यावरच येथील शेतीचे भवितब्य अवलंबून आहे.

कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा पाणलोटात अद्यापही मान्सूनची प्रतीक्षा आहे. काल पाणलोटात वाढत्या उष्म्याने ग्रामस्थ हैराण झाले होते.

दरम्यान, नगर जिल्ह्यातही अन्य भागात मान्सूनची प्रतिक्षा असून पेरण्या खोळबंल्या आहेत. काही गावे सोडलीतर अन्य ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. काही गावांतर पावसाचा अजूनही पत्ताच नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com