भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस

भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा धरण परिसर तसेच पाणलोटात विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात काल गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत भंडारदरात या पावसाची नोंद 15 मिमी झाली. रतनवाडी आणि घाटघरध्येही जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

या पावसामुळे काही ठिकाणी सोंगणीला आलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे. या अवकाळी संकटामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला आहे. काल सायंकाळी भंडारदरा धरणात 10987 दलघफू पाणीसाठा होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com