भंडारदरात पाऊस सुरूच

पिंपळगाव खांड निम्मे भरण्याच्या मार्गावर
भंडारदरात पाऊस सुरूच
पाऊस File PhotoRain

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा पाणलोटात पाऊस पुन्हा कोसळू लागल्याने शेतकर्‍यांना हायसे वाटले आहे. पाऊस कोसळत असलातरी फारसा जोर नाही. दरम्यान अधूनमधून पडणार्‍या पावसामुळे डोंगरदर्‍या हिरव्यागार दिसू लागल्या आहेत.

भंडारदरा, घाटघर, पांजरे आणि रतनवाडीत काल गुरूवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. काल सायंकाळी 6 वाजता भंडारदरात 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 5227 दलघफू होता. विद्युत गृह क्रमांक 1 मधून 840 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत पाणलोटात पडलेला पाऊस असा- (मिमीध्ये) भंडारदरा 22, घाटघर 29, पांजरे 21, रतनवाडी 23, वाकी 20. हरिश्चंद्रगड, आंबित व अन्य भागात बुधवारच्या तुलनेत गुरूवारी पावसाचे प्रमाण काहीसे वाढल्याने मुळा नदीतील पाणी वाढले आहे. ही नदी 450 क्युसेकने वाहती असून 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. हे धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर असून पाणलोटातील पाऊस वाढल्यास कोतुळ पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलावरची वाहतूक विस्कळीत होणार आहे. या ठिकाणी पर्यायी पुलाचे काम सुरू आहे. पण नदीला पाणी वाढल्यास हे कामही बंद होण्याचा अंदाज आहे.

नगर जिल्ह्यात पावसाचा अंदाज

नगर जिल्ह्यात आज शुक्रवारी दुपार नंतर जोरदार पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. दुपारी 1 वाजेनंतर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची शक्यता डख यांनी व्यक्त केली आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com