भंडारदरा पाणलोटात पाऊस

भंडारदरा पाणलोटात पाऊस

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाचे परिणाम अद्यापही भंडारदरा पाणलोटात जाणवत आहेत. काल बुधवारी सलग तिसर्‍या दिवशी या भागात पाऊस कोसळत होता. काल झालेल्या या पावसाची नोंद 23 मिमी झाली आहे.

चक्रीवादळाचा फटका अकोले तालुक्याला बसला. गत दोन दिवसांत या भागात वादळी पाऊस झाला. त्यात शेतकर्‍यांचे नुकसान झाले. काल बुधवारी सकाळी 8.30 वाजता पावसास सुरूवात झाली. त्यानंतर अधून मधून जोरदार सरी कोसळत होत्या. तो दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू होता. त्यानंतर सायंकाळी पुन्हा पाऊस सुरू होता. सायंकाळी 6 वाजेपर्यंत भंडारदरात 23 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

घाटघर, पांजरे, रतनवाडीतही पाऊस कोसळत होता. याची आकडेवारी आज उपलब्ध होणार आहे. या पावसामुळे या भागात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे या भागातील शेतकर्‍यांना अडीचणींशी सामना करावा लागत आहे. दरम्यान, सायंकाळी 6 वाजता विद्युत गृहातून पाणी 840 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. भंडारदरा धरणात यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे. सोमवारी मुळा पाणलोटातही सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस कोसळला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com