भंडारदरा ओव्हरफ्लो वाढला

निळवंडेतूनही पाणी सोडले || प्रवरा नदीत 5367 क्युसेक विसर्ग
पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी स्पीलवेतून विसर्ग वाढविण्यात आला आहे.
पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी स्पीलवेतून विसर्ग वाढविण्यात आला आहे.

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

पाणलोटात पाऊस सुरू असून आवक वाढत असल्याने काल मंगळवारी सकाळपासून 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यात येत आहे. सुरूवातीला 2339 क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत होते. पण पाऊस वाढल्याने काल बुधवारी सायंकाळी 4739 क्युसेक करण्यात आला होता.

काल सायंकाळी भंडारदरातील पाणीसाठा 9519 दलघफू (86.23 टक्के) होता. स्पिलवे 3580 क्युसेक, विद्यत गृह 832 क्युसेक असा एकूण 4739 क्युसेकने सोडण्यात येत आहे. भंडारदरात काल दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद 23 मिमी झाली आहे. 229 दलघफू नवीन पाणी दाखल गझाले. त्यातील 186 दलघफू पाण्याचा वापर झाला. हे पाणी खाली निळवंडे धरणात जमा होत आहे. त्यामुळे निळवडे 82.52 टक्के भरले आहे. हेही धरण लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. 8030 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 6872 दलघफू पाणीसाठा आहे.

बारा तासांत 230 दलघफू पाणी या धरणात दाखल झाले. पाऊस सुरू असून आवक वाढल्याने या धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी या धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे. काल सायंकाळी या धरणातून 5367 क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत होते. केवळ दोन आठवड्यात ही किमया झाली आहे. भंडारदरात नव्याने 7984 दलघफू पाणी दाखल झाले. भंडारदरा पाणलोटात काल सकाळपर्यंत नोंदवला गेलेला पाऊस असा (मिमी)-भंडारदरा 62, घाटघर 86, रतनवाडी 82, वाकी 49.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com