भंडारदरा
भंडारदरा
सार्वमत

भंडारदरा 55 टक्के भरले मुळा आज निम्मे होणार

Arvind Arkhade

भंडारदरा, कोतूळ|वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात गत दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणांत नव्याने पाण्याची जोरदार आवक होत आहे. काल दिवसभरात 232 दलघफू नवीन पाण्याची आवक झाल्याने सायंकाळी 11039 दलघफू क्षमतेच्या धरणातील पाणीसाठा 6068 दलघफू (54.61 टक्के) झाला होता. रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठ्याने 55 टक्क्यांचा टप्पा ओलांडला.

निळवंडे धरणातही आवक होऊ लागली असून या धरणातील पाणीसाठा हलू लागला आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 4359 दलघफू होता. मुळा धरण पाणलोटातही जोरदार पाऊस सुरू असल्याने कोतूळ येथे मुळा नदी 6260 क्युसेकने वाहती होती.

त्यामुळे मुळा धरणात नव्याने पाणी दाखल होत आहे.26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात काल सकाळी 12497 दलघफू 48.07टक्के) होता. त्यात सायंकाळी भर पडली. तो 12600 दलघफू झाला होता. आज रात्री उशीरापर्यंत हे धरण निम्मे भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भंडारदरा आणि मुळा पाणलोटात पाऊस सुरू झाल्याने डोंगरदर्‍या धुक्याने लेपाटून गेल्या आहेत. पावसाळी वातावरण असल्याने जनजीवन गारठून जावू लागले आहे. डोंगरदर्‍यांमधून अधूनमधून डोकवणारे धबधबे, खळखळणारे ओढे नाले..तसेच सर्वत्र निसर्ग हिरवाईने नटल्याने सौंदर्यातआणखीनच भर पडली आहे. पावसामुळे भाताची रोपं तरारली आहेत. अनेक ठिकाणी भात आवणीला जोर आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com