भंडारदरात हजेरी, मुळा पाणलोटात पावसाची उघडीप

भंडारदरात हजेरी, मुळा पाणलोटात पावसाची उघडीप

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा धरण (Bhandardara Dam) परिसरात काल मंगळवारी दिवसभर ऊन होते. पण सायंकाळी 6.30 वाजेपासून जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू होता. तसेच पाणलोटातही पावसाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान, मुळा पाणलोटात (Mula watershed) काल पावसाची उघडीप होती.

दोन दिवसांत पाणलोटातील (watershed) जोर ओसरला होता. काल केवळ घाटघर (Ghatghar) येथे 38 मिमी पावसाची नोंद झाली. अन्य ठिकाणी पाऊस नव्हता. कालही ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. पण सायंकाळी नूर बदलला आणि जोरदार सरी कोसळू लागल्या. त्यामुळे डोंगरदर्‍यांवरील धबधबे (Waterfalls) सक्रिय झाल्याने ओढेनाले खळखळू लागले होते.

11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात (Bhandardara Dam) काल सकाळी 5222 दलघफू पाणीसाठा होता. या धरणातून विद्युतगृह क्र. 1 मधून 840 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. 8320 दलघफू क्षमतेच्या निळवंडे धरणात 1040 दलघफू पाणी असून 900 क्युसेकने आवर्तन सुरू आहे. दरम्यान, मुळाच्या पाणलोटात (Mula watershed) पावसाची उघडीप होती. काल सकाळी मुळा नदीतील विसर्ग 1394 क्युसेक होता. त्यात घट होऊन तो 1150 क्युसेकवर आला होता.

कुकडी क्षेत्रातही पाऊस

शिरूर तालुक्यांसह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांना वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगे, वडज, डिंभे, घोड या धरणांच्या क्षेत्रात कमी अधिक पाऊस होत असल्याने पाणीसाठ्यात हळूवार वाढ होत आहे.पिंपळगाव जोगे धरण पाणलोटात फारसा पाऊस नसल्याने पाणीसाठा वाढलेला नाही. पण येडगाव धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. या धरणातील पाणीसाठा950 दलघफू झाला आहे. वडजमध्ये 400, माणिकडोहमध्ये 970, डिंभेत 2820 तर घोडमध्ये 1439 दलघफू पाणीसाठा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com