भंडारदरा, मुळा पाणलोटात पावसाचे पुनरागमन

भंडारदरा, मुळा पाणलोटात पावसाचे पुनरागमन

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Kotul

गायब झालेल्या पावसाचे काल भंडारदरा आणि मुळा पाणलोटातून पुनरागमन झाल्याने शेतकर्‍यांच्या पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत.

मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर पाणलोटात मान्सूनही दाखल झाला. दोन दिवस मान्सून सक्रिय होता. पण त्यानंतर अचानक गायब झाल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. काल बुधवारी सकाळपासून अधूनमधून भंडारदरा आणि घाटघर व अन्य भागात रिपरिप सुरू आहे. काल सायंकाळी भंडारदरात 7 मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 5256 दलघफू पाणीसाठा आहे. या धरणातून 840 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

कोतूळमध्ये पाऊस नसला तरी मुळाच्या पाणलोटातील हरिश्चंद्र गड, आंबित भागात रिमझीम पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळा नदीत 300 क्युसेकने पाणी सुरू असून पिंपळगाव खांड धरणात पुन्हा नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. 600 दलघफू क्षमतेचे हे धरण निम्मे झाले असून पाऊस वाढल्यास लवकरच ते ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com