भंडारदरा, मुळा पाणलोटातही पावसाची हजेरी

अकोलेत धुवाधार पाऊस
भंडारदरा, मुळा पाणलोटातही पावसाची हजेरी

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

गणरायाचे आगमन होत असतानाच भंडारदरा, मुळा पाणलोटात जोरदार पाऊस कोसळत होता. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. डोंगरदर्‍यांमधील धबधबे सक्रिय झाले होते. ओढे नाले खळखळत होते. या पावसामुळे दोन्ही धरणांमध्ये पाण्याची आवक होणार आहे.

अकोलेत धुवाधार पाऊस

अकोले |प्रतिनिधी| Akole

गणरायाचे आगमन होत असतानाच अकोले शहरासह तालुक्यात धुवाधार पाऊस झाल्याने सखल भागात पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. काल बुधवारी उकाडा अधिक वाढला होता. अशातच अकोलेकरांनी गणरायाची भक्तीभावाने वाजत गाजत घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांच्या मंडपात प्रतिष्ठापना केली. पण सायंकाळी साडेसात वाजता धुवाधार पाऊस झाल्याने गणेशभक्तांसह सर्वांची दाणादाण उडाली. गेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारव्याचा दिलासा मिळाला. सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने कमी अधिक किंवा तुरळक प्रमाणात रातवा चालूच राहण्याची शक्यता आहे. या मुसळधार पावसामुळे अकोले शहरातील महात्मा फुले चौक ते कोतुळेश्वर गॅरेज पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा तळमजल्यातील गाळ्यांत पाणी शिरल्याने अनेक व्यापार्‍यांचे नुकसान झाले. रात्री 10.30 वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता. त्यात वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com