भंडारदरा धरणात बुडालेल्या त्या अज्ञात तरुण पर्यटकाचा मृतदेह 28 तासांनंतर सापडला

भंडारदरा धरणात बुडालेल्या त्या अज्ञात तरुण पर्यटकाचा मृतदेह 28 तासांनंतर सापडला

अकोले |प्रतिनिधी| Akole

भंडारदरा धरणात पोहण्यासाठी (swim in Bhandardara dam) शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गेलेल्या ‘त्या’अज्ञात तरुण पर्यटकाचा मृतदेह (Dead body) शनिवारी रात्री आठच्या सुमारास म्हणजेच तब्बल 28 तासांनंतर स्पिलवे गेटच्या जवळील पाण्यावर तरंगताना अकोले (Akole) तालुक्यातील राजूर पोलिसांना (Rajur Police) आढळून आला.

याबाबत राजूर पोलिसांकडून (Rajur Police) मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी सायंकाळी चारच्या दरम्यान भंडारदरा धरणात (Bhandardara dam) एक पर्यटक बुडाला (tourist drowned) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.या नुसार सपोनि नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्या ठिकाणी पोलिसांना धरणाच्या बाहेर बूट आणि सॉक्स आढळून आले. त्याच्या सोबत असणारे काही जण घाबरून पळून गेले असल्याचे पोलिसांना तेथील काही लोकांनी सांगितले. त्यावेळी काही स्थानिक लोक धरणात त्या व्यक्तीचा शोध घेत होते. नेमकी माहिती मिळत नसली तरी पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांनी शेंडी येथून काही सराईत पोहणारे लोक घेऊन आले. त्यांनी पाण्यात बुड्या घेऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र रात्र झाली आणि शोध कार्य थांबले. शनिवारी पुन्हा प्रयत्न केले. यानंतर शनिवारी रात्री आठच्या सुमारास स्पिलवे गेट जवळ त्या व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी काही स्थानिकांच्या मदतीने तो मृतदेह पाण्याबाहेर काढला .

दरम्यान या मयत पर्यटका बरोबर कोण होते याची माहिती पोलिसांना मिळाली नाही. त्यामुळे त्याची ओळख पटलेली नाही. सदर तरुणांचे वय 25 ते 30 वर्षे असून उंची सुमारे168 सेंटीमीटर आहे. सडपातळ आणि लांबट चेहरा काळी पँट परिधान केलेल्या या मयत तरुणाच्या चेहर्‍यावर दाडी मिशी असल्याचे वर्णन पोलिसांनी दिले असून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी राजूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन स.पो.नि. साबळे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com