भंडारदरा पाणलोटात आषाढ सरींचे तांडव

कोथळा बंधारा ओव्हरफ्लो, वाकी भरण्याच्या मार्गावर
भंडारदरा पाणलोटात आषाढ सरींचे तांडव
भंडारदरा

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याला (AhmedNagar District) वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात (Bhandardara Dam watershed) आषाढ सरींचे तांडव सुरू असून नवीन पाण्याची जोरदार आवक (inflow of new water) होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा (Dam WaterStorage) तासागणिक वाढू लागला आहे. गत 12 तासांत 372 दलघफू पाणी दाखल झाले. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 5796 दलघफू (50.52 टक्के) पाणीसाठा झाला आहे. पावसाचे प्रमाण असे टिकून राहिल्यास आज गुरूवारी रात्री उशीरापर्यंत या धरणातील पाणीसाठा (Dam Waterstorage) 57 टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे.

गत चार दिवसांपासून भंडारदरा पाणलोटात (Bhandardara Dam watershed) आषाढ सरींचा फेरा वाढला आहे. सह्याद्रीच्या रांगा धुक्याने लेपाटून गेल्या आहेत. धो-धो पाऊस कोसळत असल्याने धबधबे आक्राळविक्राळ रूप धारण करू लागले आहेत. ओढ्यांना पूर आला आहे. वार्‍यामुळे गारवा आहे. परिणामी जनजीवन गारठून गेले आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात मंगळवारी सायंकाळी 5275 दलघफू पाणीसाठा होता. त्यानंतरच्या 24 तासांत तब्बल 521 दलघफू पाणी दाखल झाल्याने बुधवारी सायंकाळी हा पाणीसाठा 5796 दलघफू झाला होता. पाऊस आणि पाण्याची आवक पाहता आज रात्री उशीरापर्यंत हे धरण 57 टक्के भरणार आहे. बुधवारीही भंडारदरात जोरदार पाऊस (bhandardara Heavy Rain) सुरू होता. या पावसाची नोंद 37 मिमी नोंदवली गेली आहे. घाटघर (Ghatghar), पांजरे(Panjare), रतनवाडीतही (Ratanwadi) धो-धो पाऊस कोसळत असल्याने धरणात विक्रमी पाण्याची आवक होणार आहे.

8320 दलघफू क्षमतेच्या निळवंडेतही (Nilwande) नवीन पाणी येत असून काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 1600 दलघफू होता. 102 दलघफू क्षमतेचे वाकी तलावातील पाणीसाठा (Waki Pond Water Storage) 87 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे हा तलावही भरण्याच्या मार्गावर आहे.

कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा पाणलोटातही (Mula watershed) कोतूळ (Kotul), हरिश्चंद्र गड (Harishchandra Gad), आंबित (Ambit), पाचनईत (Pachnait) काल बुधवारी कधी रिमझीम तर कधी मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे मुळा नदीतील (Mula river) पाणीपातळी सकाळी 5826 क्युसेक होती.त्यामुळे 26000 दलघफू क्षमतेच्या मुळातील पाणीसाठा (Mula Waterstorage) 10451 दलघफू (40.20) टक्के झाला होता.

मुळा पाणलोटातील 102 दलघफू क्षमतेचा कोथळे बंधारा मंगळवारी रात्री उशीरा ओव्हरफ्लो झाला. या ओव्हरफ्लोचे पाणीही आता मुळा नदीत येत आहे.

पाऊस मिमी

भंडारदरा 117

घाटघर 122

पांजरे 122

रतनवाडी 155

वाकी 95

कोतूळ 05

भंडारदरा - सध्याचा साठा 5756 (दलघफू)

मुळा धरण- सध्याचा साठा 10451 (दलघफू)

मुळा विसर्ग - 5826 क्युसेक

कुकडी धरणात 24 तासांत वाढले एक टीएमसी पाणी

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जतला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोटात जोरदार पाऊस सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत या प्रकल्पात तब्बल 1006 दलघफू (24.52 टक्के)पाणी नव्याने दाखल झाल्याने एकूण पाणीसाठा 7277 दलघफू झाला आहे. डिंभे धरणाची साठवण क्षमता 13.50 टीएमसी आहे. या धरणात सर्वाधिक 516 दलघफू नवीन पाण्याची आवक झाल्याने 5221 दलघफू पाणीसाठा झाला आहे. येडगाव धरणात 1407, माणिकडोह 2304, वडजमध्ये 643 दलघफू पाणीसाठा आहे. घोड धरणातील पाणीसाठा 1548 दलघफू आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com